Sanjay Raut News: 'फडणवीस आणि अजित पवारांचे आभार मानतो' ; पहाटेच्या शपथविधीवर काय म्हणाले राऊत?

Morning Oath Ceremony: शरद पवारांना समजून घ्यायला १०० जन्म घ्यावे लागतील..
Devendra Fadnavis - Ajit Pawar, Sanjay Raut
Devendra Fadnavis - Ajit Pawar, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचे कवित्व संपताना दिसत नाही. फडणवीसांनी या शपथविधीवर गौप्यस्फोट केला होता. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवटीची कोंडी फुटली असल्याचे त्यांनी सांगितले. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या शपथविधीबाबत फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचे जाहीर आभार मानले आहेत.

Devendra Fadnavis - Ajit Pawar, Sanjay Raut
Chinchwad By- Election : चर्चा तर होणारच...! अश्विनी जगतापांसाठी मुलींसह संपूर्ण कुटुंब मैदानात

संजय राऊत म्हणाले, "हे जे सरकार दिल्लीत आणि राज्यात होतं. त्यांनी या राज्यात राष्ट्रपती राजवट लावून महाविकास आघाडीचं सरकार यऊ नये अशी कोंडी करून ठेवली होती. ही कोंडी फुटेल की नाही अशा शंका सर्वांना होत्या. जरी आम्ही बहुमत दाखवलं असतं, पण ज्या प्रकारचे राज्यपाल महाराष्ट्रात हो,त्यांनी बहुमताची डोके मोजायलाच पाच वर्षे घेतली असती, पण पहाटेच्या शपथविधीमुळे ही कोंडी फुटली. दिल्लीतून राष्ट्रपती राजवट चोवीस मिनिटात मागे घेतली. या पहाटेच्या शपथविधीमुळे महाविकास आघाडीचा मार्ग मोकळा झाला. "

Devendra Fadnavis - Ajit Pawar, Sanjay Raut
By- Election Campaign : पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात; शिंदे उतरणार कसब्याच्या मैदानात

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल भाष्य करताना राऊत म्हणाले, "शरद पवारांना ओळखायला शंभर जन्म घ्यावे लागतील, असं मी मागे एकदा म्हणालो तेव्हा माझ्यावर टीका झाली. तुम्हाला असं कळलं असेल. राष्ट्रपती राजवटीची कोंडी फुटायला पहाटेच्या शपथविधीची मदत झाली. नाहीतर आमचं सरकार येतंय, बहुमत झालंय. ते आमचं बहुमत तोडण्यासाठी राष्ट्रपती राजवट कायमची ठेवली असती. ही कोंडी फोडल्याबद्दल मी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानतो. त्यांनी ही कोंडी फोडायला मदत केली. "

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com