Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar News: "महापुरूषांच्या अवमानामुळे जनतेत तीव्र नाराजी, राग मोर्चात दिसेल!"

Sharad Pawar : मोर्चाच्या संबंधी लोकांची औत्सुकता आहे आणि रागही आहे.

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या हल्लाबोल मोर्चा आणि महापुरूषांचा अवमानकारक या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. महापुरूषांबद्दल अवमानकारक वक्तव्ये असतील, जबाबबदार लोकांनी केलेली ही विधाने सामान्य माणसाला अस्वस्थ करणारी आहेत. याचाच राग मोर्चामध्ये दिसेल, याचा मला विश्वास आहे, पवार म्हणाले.

पवार म्हणाले की, मुख्यमत्र्यांचं विधान ऐकलं. त्यांनी स्वच्छ सांगितलं होतं की, लोकशाहीमध्ये हा मोर्चाचा अधिकार आहे. यातून त्यांनी परवानगी मिळण्याचे स्वच्छ संकेत दिले होते. यात काही आपल्याला आश्चर्य वाटत नाही. या मोर्चाच्या संबंधी लोकांची औत्सुकता आहे आणि रागही आहे. राग विशेषत: जे काही घडलं. महापुरूषांबद्दल अवमानकारक वक्तव्ये असतील, आंबेडकरांबद्दल असेल, शिवाजी महाराजांबद्दल असेल, महात्मा फुलेंबद्दल असेल, जबाबबदार लोकांनी केलेली ही विधाने सामान्य माणसाला अस्वस्थ करणारी आहेत. याचीच प्रतिक्रिया मोर्चामध्ये दिसेल, याचा मला विश्वास आहे.

उदयनराजे भोसलेंनी योग्य भूमिका योग्य घेतली. त्याबद्दल आम्हाला समाधानच आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जी काळजी घ्यायला हवी होती ती घेतील नाही. याबाबत त्यांची भूमिका बघ्याची आहे. यामुळेच लोकांमध्ये संताप आहे, असेही पवार म्हणाले.

लोकांमध्ये संताप आहे. महापुरूषांनी भीक मागून शाळा चालवल्या, असं बोललं गेलं. शाळेतील मुलांना दोन वेळ अन्न देण्याचा प्रश्न आला तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटलांनी पत्नीच्या गळ्यातले दागिने विकले. त्यामुळे असे शब्दप्रयोग करणं योग्य नाही. एवढं मोठं योगदान दिलं त्यांच्याबद्दल अशा पद्धतीने बोलणं, हे अत्यंत चुकीचं आहे. व्यक्त होण्याचं तारतम्य आताच्या राजकारण्यांना नाहीये, असेही पवार म्हणाले.

राज्यपालांनी शिवाजी महारांजांबद्दल बोलणं चुकीचं होतं. आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आज ना उद्या केंद्र सरकारला पाऊल उचलावं लागेलच, असे पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT