Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar Threat Case : पवारांना धमकी दिल्याची दोन कारणे उघडकीस ; महाराष्ट्रातील परिस्थितीमुळे..

Sharad Pawar Threat Case : सागर बर्वे हा तपासात सहकार्य करीत नसल्याचा दावा पोलिसांचा न्यायालयात केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : गेल्या शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांना सोशल मीडिया वरून दाभोळकर करण्याची धमकी देण्यात आली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यभर अनेक ठिकाणी आंदोलने सुद्धा झाली होती.

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत पुण्यातून सागर बर्वे याला अटक केली आहे. सागर हा आयटी इंजिनिअर असल्याची माहिती मुंबई पोलिसानी दिली आहे.

या प्रकरणात नवी अपडेट येत आहे. आरोपी सागर बर्वे यांनी नैराश्यातून शरद पवारांना धमकी दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. लग्न होत नसल्याने तसेच सध्याच्या महाराष्ट्रातील परिस्थितीमुळे सागर बर्वे हा नैराश्यात होता, असे पोलिस सुत्रांनी सांगितले. सागर बर्वे हा तपासात सहकार्य करीत नसल्याचा दावा पोलिसांचा न्यायालयात केला आहे.

'नर्मदाबाई पटवर्धन' या नावाच्या अकाउंटवरुन शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. फेसबूकपोस्टमध्ये शरद पवार यांना उद्देशून 'तुझा लवकरच दाभोलकर होणार', अशी धमकी देण्यात आली होती.

तर सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर हँडलवरुन शरद पवार यांची औरंगजेबासोबत तुलना करत आक्षेपार्ह भाषेचा वापर केलेला मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. आरोपी सागर बर्वे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असून त्यानेच दोन्ही अकाउंट तयार केल्याचा पोलिसांना संशय आहे.

शरद पवार यांना धमकी आल्याने खळबळ उडाली असतानाच त्याच दिवशी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि सुनील राऊत यांनाही धमकीचे फोन आले आहेत. सुनील राऊत यांच्या फोनवर अज्ञाताने कॉल करुन दोघाही भावांना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहेत. एकाच दिवशी राज्यातील तीन दिग्गज नेत्यांना धमक्या आल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT