Maharashtra Politics : मुख्यमंत्र्यांची सपशेल माघार; नव्या जाहिरातीत शिंदेंइतकीच फडणवीसांची लोकप्रियता !

New Advertisement Shivsena Bjp : बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो छापण्यात आला आहे.
New Advertisement Shivsena Bjp :
New Advertisement Shivsena Bjp :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना-भाजप युतीची झळकलेली जाहिरात अनेक वृत्तपत्रांची 'हेडलाईन' झाली. या जाहिरातीनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. भाजपच्या काही नेत्यांनी यावरुन नाराजी व्यक्त केली होती.

या जाहीरातीवरुन विरोधकांना टीका करण्यासाठी आयत कोलीत मिळाल होत. आज (बुधवारी) शिवसेनेनं पुन्हा पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून सारवासारव करण्यात येत आहे.

New Advertisement Shivsena Bjp :
Vasant More Audi Car: ED च्या भीतीनं खासदारकीसाठी इच्छुक असलेल्या मनसे नेत्यानं केला मोठा खुलासा; उगाच ईडीवाले यायचे..

‘राष्ट्रात मोदी अन् महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात शिवसेनेनं (शिंदे गट) वर्तमान पत्रांमध्ये छापून आणली. या जाहिरातीवरून वाद झाला होता. त्यानंतर आता भाजप-शिवसेना युतीची नवी जाहिरात समोर आली आहे. या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो छापण्यात आला आहे. (Latest Marathi News)

पहिल्या जाहिरातीवर मोठा वाद निर्माण झाल्यानंतर जाहिरातीतली चूक दुरुस्त करण्यात आली आहे. बुधवारी पुन्हा नव्यानं जाहिराती दिली आहेत. या नव्या जाहिरातीमध्ये मात्र एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचा फोटो झळकतो आहे. दोघांच्या नेतृत्वाला महाराष्ट्राची साथ दिली आहे, अशी ग्वाही देण्यात आली आहे.

नरेंद्र मोदी यांच्या साथीनं विकासाचे पर्व महाराष्ट्रात आलं आहे, असं सांगितलं आहे. पहिल्या जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना डिवचण्याचा प्रयत्न झाला होता, तो दुरुस्त नव्या जाहीरातीत दुरुस्त करण्यात आला आहे. जनतेचा कौल शिवसेना-भाजप युतीलाच असा दावा सुद्धा जाहिरातून करण्यात आला आहे. तर ४९.३० टक्के जनतेचा शिंदे-भाजप सरकारला आर्शिर्वाद आहे, असंही या जाहिरातीत म्हटलं आहे.

New Advertisement Shivsena Bjp :
Eknath Shinde on Abdul Sattar : मुख्यमंत्र्यांनी सत्तारांचे कान टोचले ; कारभार सुधारा ; तुमचे जे चालले ते वाईट..

ही जाहिरात दिलेलीच नव्हती ..

काल प्रकाशित झालेल्या जाहिरातीनंतर मुख्यमंत्र्यांनी आपण ही जाहिरात दिलेलीच नव्हती अशी भूमिका घेतली. कोल्हापूर मधल्या जाहीर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलं. एक प्रकारे आज केलेली चुकीची दुरुस्ती ही एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या दबावासमोर माघार घेतल्याचं दिसत आहे.

कालच्या जाहीरातीत काय होते?

काल शिवसेनेकडून (शिंदे गट) महाराष्ट्रातील जवळपास सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली होती. 'देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशा आशयाची ही जाहिरात होती. तसेच, या जाहिरातीत मुख्यमंत्रीपदासाठी 26.1 टक्के जनतेची शिंदेना तर 23.2 टक्के जनतेची पसंती फडणवीसांना असल्याचा उल्लेख जाहीरातीत करण्यात आला होता. त्यामुळे भाजपमधून नाराजीचा सूर आवळला होता.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com