Mahavikas Aaghadi News Sarkarnama
मुंबई

Mahavikas Aaghadi News : पवार-ठाकरेंची 'मास्टर' खेळी अन् १०५ जागा मिळवून मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचा 'करेक्ट कार्यक्रम'!

Deepak Kulkarni

Mumbai News : महाराष्ट्रात एकमेकांचे तोंड न पाहणारे पक्ष एकत्र आले अन् २५ वर्षांपासून जवळ असलेले भाजप व शिवसेना पक्ष वेगळे झाले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. अशा पद्धतीने महविकास आघाडीतील पक्ष एकत्र आले, त्या निवडणुकीचा निकाल २५ ऑक्टोबर २०१९ ला लागला. त्या घटनेला बुधवारी चार वर्षे पूर्ण झाली.

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल २५ ऑक्टोबर २०१९ ला लागला. या निवडणुकीत शिवसेना-भाजप (Shivsena) महायुतीने बहुमत प्राप्त केले होते. त्यामुळे दिवाळीनंतर शिवसेना-भाजप महायुती सरकार स्थापन करेल असे चित्र होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र, हे निकाल लागल्यानंतर दहा दिवसांच्या काळातच आकडेवारी पाहून अनेकांनी वेगवेगळी रणनीती आखली. सर्वाधिक जागा जिंकून मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली.

या चार वर्षांत राज्यांनी तीन मुख्यमंत्री सत्तेत आलेली पाहिली आहेत, तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. या फुटाफुटीनंतर सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. त्यामुळेंच उर्वरित वर्षभराच्या काळात काय होणार हे राजकीय धुरिणींसह विश्लेषक, अभ्यासक छातीठोकपणे सांगू शकत नाहीत.

२०१९ नंतर विधानसभा निवडणूक निकालाला चार वर्षे पूर्ण झाली. भारतीय जनता पक्षाने पुन्हा १०५ जागा जिंकल्या तर शिवसेनेने ५६ जागा जिंकत दुसऱ्या स्थानावर राहिली. महायुतीच्या दोन्ही पक्षाचे मिळून बहुमत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ५४ जागा जिंकल्या, तर काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या होत्या, तर अपक्ष २९ जागी विजयी झाले होते. त्यामुळे महायुती सरळ सत्तेत येणार असे वाटत असताना मुंबईतील ट्रायडंट हॉटेलवर महाविकास आघाडीतील(Mahavikas Aagahdi) बैठकी झडू लागल्या. त्यामध्ये नवीन महविकास आघाडी उदयास आली.

या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत काँग्रेस नाराजीनाट्यानंतर सहभागी झाल्याचे पाहावयास मिळाली. केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही आघाडी एकत्र आली. मात्र, खातेवाटपाचे घोडे अनेक दिवस अडल्याने मध्ये एक महिन्याचा कालावधी लोटला. त्यामुळे कोणीच सत्तास्थापन करत नसल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारीने राज्यात राष्ट्रपती राजवट लावली.

राष्ट्रपती राजवट लागू केल्याने सर्वच जण स्तब्ध झाले. सर्वच राजकीय पक्षांना आता काय होणार, अशी भीती वाटण्यास सुरुवात झाली. त्यातच देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी एकत्रित येत पहाटेचा शपथविधी उरकला. मात्र, देवेंद्र फडणवीस सरकार अल्पजीवी ठरले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार २८ नोव्हेंबर २०१९ ला सत्तेत आले. हे सरकार अडीच वर्षे चालले.(Shivsena)

जून २०२२ ला शिवसेनेत फूट पडली व एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदार शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर तिसऱ्यांदा एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यापुढे वर्षभरानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित पवार या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे सर्व काही आलबेल आहे, अशी परिस्थिती अजूनही नाही. शिवसेना व राष्ट्रवादीमधील या फुटाफुटीनंतर सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT