jitendra awhad & sharad pawar Latest News sarkarnama
मुंबई

शरद पवार यांची रुग्णालयातून राष्ट्रवादीच्या शिबिरात हजेरी; आव्हाडांची भावूक फेसबुक पोस्ट, म्हणाले...

Jitendra Awhad : राजकारण हे 24 तास करावं लागतं. त्याच्या अधे-मधे सुट्टी घेता येत नाही.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या आजारपणामुळे मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील शिबिराला उपस्थित राहतील की नाही याबाबत अनेकांच्या मनात शंका होती. मात्र पवार हे थेट रुग्णालयातून राष्ट्रवादीच्या शिबीरासाठी उपस्थित राहिले. यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांचा कमालीचा उत्साह वाढलेला दिसत आहे. (jitendra awhad & sharad pawar Latest News)

दरम्यान, आजारी असताना देखील पवार यांनी शिबिराला उपस्थिती लावल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पवार यांच्याबद्दल फेसबुकवर एक भावूक पोस्ट लिहिली आहे.

आज साहेब थेट इस्पितळातून निघून शिबीरामध्ये आले आणि परत निघून आता इस्पितळात दाखल झाले असतील. तब्येत साथ देत नसताना कार्यकर्त्यांमध्ये जोम आणि उत्साह आला पाहिजे आणि तो माझ्यामुळेच येईल याची त्यांना कल्पना असल्यामुळे आज ते शिबीरामध्ये दाखल झाले. त्यांच्या ईच्छाशक्तीला सलामच करावा लागेल, अशा शब्दात आव्हाड यांनी पवारांबद्दलच्या आपल्या भावना फेसबुक पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत.

आव्हाड आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले, "आज साहेब थेट इस्पितळातून निघून शिबीरामध्ये आले आणि परत निघून आता इस्पितळात दाखल झाले असतील. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत राजकारण करायच असत आणि त्या प्रतिकूल परिस्थितीची दिशा बदलून ती आपल्या दिशेने वळवायची आणि त्यावरुन मार्गक्रमण करुन त्याच्यावर विजय प्राप्त करायचा हा त्यांचा स्थायी स्वभाव. आजही तब्येत साथ देत नसताना कार्यकर्त्यांमध्ये जोम आणि उत्साह आला पाहिजे आणि तो माझ्यामुळेच येईल याची त्यांना कल्पना असल्यामुळे आज ते शिबीरामध्ये दाखल झाले.

त्यांच्या ईच्छाशक्तीला सलामच करावा लागेल. राजकारण हे 24 तास करावं लागतं. त्याच्या अधे-मधे सुट्टी घेता येत नाही. हे त्यांनी साठ वर्षे केले आणि आजही ते करीत आहेत. राजकारण हे सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत करण्याचा विषय नाही. तर सकाळी 7 ते दुस-या दिवशी सकाळी 7 म्हणजे 24 तास 365 दिवस करण्याचा विषय आहे हे त्यांच्या क्रियेतून ते दाखवतात." अशी पोस्ट आव्हाड यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT