Kolhapur : '22 आमदार फुटणार', खैरेंवर काँग्रेस नाराज, महाविकास आघाडीत ठिणगी!

Satej Patil : खैरेंनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं, काँग्रेसची मागणी.
Satej Patil
Satej Patil Sarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेस पक्षाबाबत खळबळजनक दावा केला होता. काँग्रेसचे 22 आमदार फुटणार असे वक्तव्य खैरे यांनी केले आणि यावरून आता राजकीय नाट्य रंगत आहे. काँग्रेसकडूनही प्रतिक्रीया आली आहे. खैरेंनी आपलं वक्तव्य मागं घ्यावं, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

खैरेंनी केलेले वक्तव्य संयुक्तिक नाही. त्यांनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं, अशी मागणी काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते. राज्यात सध्या नेत्यांच्या सभांना परवानगी नाकारण्याचा ट्रेन्ड सुरू झाला असल्याचीही टीका त्यांनी केली.

Satej Patil
Aurangabad : प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन, अन् १ रुपयांत नोंदणी ; घरकुलही मिळणार...

शिंदे गटातील 16 आमदार अपात्र ठरले तरी सरकार पडू नये आणि आपल्याला मुख्यमंत्री पद मिळावे, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या 22 आमदारांची सोय करून ठेवली आहे, असा खळबळजनक गौप्यस्फोट शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी काल औरंगाबादमध्ये केला होता. याबद्दल सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Satej Patil
पुणे जिल्ह्यातील बलाढ्य शक्तीला आम्ही जागा दाखवणार : हर्षवर्धन पाटलांचा इशारा कोणाकडे

खैरे यांनी गेली अनेक वर्ष खासदार म्हणून काम केले असून, शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत. राज्यात महाविकास आघाडी म्हणून काम करतांना खैरैंचे हे वक्तव्य योग्य नाही. त्यांन विधान मागे घ्यावे, असे पाटील म्हणाले. सध्या महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा येत असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे हे सर्व सहभागी होत आहेत. अशा वेळी खैरेंनी असे वक्तव्य करून गैरसमज पसरवू नये, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com