NCP Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

NCP Ajit Pawar: "...हेच आमच्या वरिष्ठांना सांगत होतो, पण आमचं ऐकलं नाही!"; अजितदादांचा पुन्हा शरद पवारांवर निशाणा

Ganesh Thombare

Raigad News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटातील वाद सध्या निवडणूक आयोगात सुरु आहे. यावरील निवडणूक आयोगातील सुनावणीही अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला आहे.

"लोकशाहीत काम करताना बहुमताचा आदर करावा लागतो. हे आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगत होतो. पण आमचं कोणी ऐकलं नाही. राजकीय भूमिका घ्याव्या लागतात. नितीश कुमार, जयललिता, ममता बॅनर्जी यांनी देखील त्या-त्या राजकीय परिस्थिती नुसार भूमिका घेतल्या. सत्तेतून लोकांची कामं करणं ही आमची भूमिका आहे. हातावर हात ठेऊन विरोध करत राहणं ही आमची भूमिका नाही. त्यामुळे परिस्थिती नुसार निर्णय घ्यावा लागतो, म्हणून आपण देखील निर्णय घेतला", असा मोठा खुलासा उपमुख्यमंत्री पवार यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कर्जतमधील बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी आरक्षण ते युती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय, अशा विविध विषयांवर भाष्य केलं. ते पुढे म्हणाले, "आम्ही विरोधी पक्षात राहिलो तर निधी देता येईल का ? प्रश्न सोडवता येतील का ?, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना पुढे घेऊन आम्ही पुढे जात आहोत. यशवंतराव चव्हाण यांचा विचार घेऊन आपण पुढे जात असू, तर मग सत्तेत सहभागी झालो तर बिघडलं कुठं ?", असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

"देशाच्या पातळीवरील राजकीय पक्षांवर एक नजर टाकली तर वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या पक्षांसोबत जातात. पण, आपली विचारधारा सोडत नाहीत. त्यामुळे मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की आमची विचारधारा स्पष्ट आहे, असे सांगत मागच्यावेळी महिलांना संधी दिली नव्हती. यावेळी जाणीवपूर्वक अदिती तटकरे यांना जबाबदारी देण्यात आली आहे", असेही त्यांनी स्पष्ट केले.

(Edited By - Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT