Shivsena V/S Shivsena News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी महापौर दत्ता दळवी यांनी आक्षेपार्ह वक्तव केल्यामुळे मुंबईत दोन्ही शिवसेना भिडल्या आहेत. दळवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन अटक झाल्यानंतर ठाकरेंची सेना अधिकच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. (MP Sanjay Jadhav News) काही वेळापूर्वी मुंबईत दत्ता दळवी यांची गाडी फोडण्यात आली, तर इकडे परभणीचे खासदार संजय जाधव यांनीही मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली.
तेलंगणामध्ये यांच्या पक्षाचा एकही उमेदवार नसताना तिथे (Eknath Shinde) मुख्यमंत्र्यांनी प्रचाराला जाणे म्हणजे `बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना`, असेच असल्याची टीका जाधव यांनी माध्यमांशी बोलताना केली. (Shivsena) राज्यातील गरीब शेतकरी संकटात असताना हे आपले पंचतारांकित शेतकरी मात्र दुसऱ्या राज्यात प्रचार करायला गेले आहेत, असा टोलाही जाधव यांनी लगावला.
मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन अटक झाल्यानंतर वातावरण चांगलेच तापले आहे. (Sanjay Jadhav) शिवसेनेचे सगळेच नेते शिंदे गटावर तुटून पडले आहेत. दोन्ही शिवसेनेत राडा होण्याची शक्यता लक्षात घेता, पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. असे असताना काही वेळापूर्वी मुंबईत दत्ता दळवी यांची गाडी फोडण्यात आली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावर शिवसेना ठाकरे गटाकडूनही चोवीस तासांत जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. इकडे मुंबईत राडा होत असताना मराठवाड्यात परभणीचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनीही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मराठवाड्यात झालेल्या अवकाळी व गारपिटीसंदर्भात पत्रकार परिषदेत जाधव यांनी मुख्यमंत्र्यांच्या तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकीतील प्रचारावरून तोंडसुख घेतले.
यांचा तिथे एकही उमेदवार नसताना प्रचाराला कशासाठी गेले ? हे म्हणजे `बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना`, असेच आहे. इकडे राज्यातील, मराठवाड्यातील शेतकरी संकटात आहेत. त्यांना तातडीने मदत जाहीर करून दिलासा देण्याची गरज असताना मुख्यमंत्री मात्र दुसऱ्या राज्यात प्रचार करत फिरत आहेत.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी सरसकट कर्जमाफी केली आणि आता हे ना अनुदान देत आहेत ना मदत. त्यातही पीकविमा अग्रिम मंजूर केला. मात्र, ताेही काहीच शेतकऱ्यांना दिला जाताेय. त्याचा लाभ सर्वांना मिळत नाही. सरकारने तत्काळ शेतकऱ्यांना भरघोस मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणीही जाधव यांनी या वेळी केली.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.