Ajit Pawar, ECI, Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

EC Notice To Sharad Pawar: शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाची नोटीस; आता पवार काय भूमिका घेणार ?

Sharad Pawar Vs Ajit Pawar : अजित पवारांच्या याचिकेनंतर निवडणूक आयोगाची भूमिका

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : शिवसेनेतील फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाले आणि राज्यातील राजकारणाचा वर्षातील दुसरा अध्याय सुरू झाला. राष्ट्रवादीतून फुटल्यानंतर अजित पवारांनी पक्ष आणि घड्याळ या चिन्हावर दावा ठोकला. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिकाही दाखल केली. यानुसार आता निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला नोटीस बजावल्याची माहिती मिळत आहे. (Latest Political News)

राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर पक्षातून आपल्याचा सर्वात मोठा पाठिंबा असल्याचा दावा करत अजित पवार गटाने पक्षासह चिन्हावरही दावा सांगितला. याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली. या याचिकेनुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला नोटीस बजावल्याचे सूत्रांनी माहिती दिली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेवर ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. अजित पवार गटाच्या याचिकेवर भूमिका मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. या नोटीशीनंतर शरद पवार काय भूमिका घेणार याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT