Jitendra Awhad, Chhagan Bhujbal Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar Vs Ajit Pawar : बीडच्या सभेनंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमनेसामने; नेमकं काय झालं ?

Jitendra Awhad Vs Ajit Pawar : बीडच्या सभेचे पडसाद ठाण्यात उमटल्याने राष्ट्रवादीत तणाव वाढणार

सरकारनामा ब्यूरो

Thane Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या सभांना जशास तसे उत्तर देणार, असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले आहे. बीडमध्ये शरद पवारांनी बंडखोरांवर सडकून टीका केली होती. या टीकेला अजित पवारांनी ठरल्याप्रमाणे प्रत्युत्तर दिले आहे. या दोन्ही सभांनतर राष्ट्रवादी आणि अजित पवार गटात संघर्ष सुरू झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी शिवसेनेतील ठाकरे-शिंदे गटातील वादानंनतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गट भिडल्याने राजकीय माहोल गरम झाला आहे. (Latest Political News)

बीडमध्ये मंत्री धनंजय मुंडेंनी जोरदार शक्तीप्रदर्शन असले तरी लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला नसल्याची टीका आमदार रोहित पवारांनी केली आहे. तसेच या सभेसाठी सत्तेचा गैरवापरही केल्याचा आरोप त्यांनी केला. शरद पवारांवर टीका केल्याने ठाण्यात मंत्री छगन भुजबळांचा पुतळा माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात जाळण्यात आला. आव्हाडांनी तीव्र शब्दात टीका करताना भुजबळांची लाजही काढली. तसेच शरद पवारांवरील टीका खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही आव्हाडांनी ट्विटद्वारे दिला आहे.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, "बीडकरांना सलाम! शरदचंद्र पवारसाहेबांच्या विरोधात ऐकून घेणार नाही, ही तुम्हा बीडकरांची भूमिका होती. त्याबद्दल तुम्हाला मानाचा मुजरा… ज्यांचं खाल्लं, प्यायलं… त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढत आहेत. #Armstrong." तसेच ठाण्यात भुजबळाचांही पुतळाही जाळून निषेध व्यक्त केला.

ठाण्यातील आव्हाड समर्थकांनी भुजबळांचा पुतळा जाळत आंदोलन केल. तर त्याला उत्तर देतांना अजित पवार गटानेही महापालिका मुख्यालयासमोर आव्हाडांचा पुतळा जाळला. शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यलय समोर अचानक अजित पवार गटाचे कार्यकर्ते जमले. तेथे त्यांनी आव्हाडांच्या विरोधात जोरदार घोषणा देत त्यांचा पुतळा जाळला.

यावेळी बोलताना परांजपे म्हणाले, "आव्हाडांनी यामध्ये पडू नये. बोलायचं असेल तर पवारसाहेब बोलतील. तुम्ही बोलणारे कोण?", असा सवाल करत जोरदार हल्लाबोल केला. या प्रकाराने ठाण्यात आज शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसून आले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT