Jalgaon Political News : वाह रं पठ्ठ्या ! ग्रामपंचयात सदस्याच्या पतीने स्वच्छतागृहाची जागाच विकली

Asalgaon Grampanchayat : आसलगाव बस स्थानकावर महिला प्रवाशांच्या अडचणीत भर
Grampanchayat
GrampanchayatSarklarnama
Published on
Updated on

Jalgaon News : पदावर महिला असेल तर अनेक ठिकणी तिचा पतीच कारभार हकताना दिसत असल्याची अनेक उदाहरणे राज्यात आहेत. असे प्रकार ग्रामपंचायत सदस्यापासून काही ठिकाणी आमदार महिलांबाबतही होताना दिसते. दरम्यान, अनेक महिला सरपंचांना या अडचणीचा सामना कारावा लागत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातही आहे. कारभारात पतीच्या लूडबुडीने महिला पदाधिकाऱ्यांना अडचणीचाही सामना करावा लागला आहे. दरम्यान, जळगावमधून असाच एक प्रकार समोर आला आहे. (Latest Political News)

जळगाव (Jalgaon) जामोद तालुक्यातील आसलगावातील एका महिला सदस्याच्या पतीने चक्क बस स्थानकावर ग्रामपंचायतीची जागाच विकली आहे. येथे प्रवाशांसाठी स्वच्छतागृह बांधले होते. या धक्कादायक प्रकाराबाबत तक्रार करण्यात आली आहे. जिल्ह्यात खळबळ उडावून देणाऱ्या या प्रकारणी आरोपीवर जिल्हा प्रशासन काय कारवाई करणार याकडेही राजकीय मंडळींचे लक्ष आहे.

Grampanchayat
BJP Politics Madhya Pradesh : भाजपची मतपेरणी सुरू; रक्षाबंधनानिमित्त महिलांसाठी मोठी घोषणा

आसलगाव ही जळगाव जामोद तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे येथे परिसरातील खेडेगावातील नागरिकांची सतत वर्दळ असते. या प्रवाशांच्या सुविधेसाठी बस स्थानकावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून स्वच्छतागृह बांधण्यात आले होते. मात्र गावातील एका सदस्याच्या पतीने ही जागा परस्पर एका हॉटेलच्या मालकाला विकल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

Grampanchayat
Vijay Wadettiwar News : दलित,ओबीसी, आदिवासींना वापरा अन् फेका ही भाजपची भूमिका ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल

आता संबंधित हॉटेलमालकाने हे स्वच्छतागृहच ताब्यात घेतल्याने प्रवाशांची, विशेषतः महिलांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या प्रकाराची ग्रामपंचायत प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. ते स्वच्छतागृह खुले करावे, अन्यथा नवीन स्वच्छतागृह बांधून महिलांची होणारी कुचंबना टाळावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. ही मागणी पूर्ण झाली नाही तर आंदोलनाचा इशाराही देण्यात आल्याचे तक्रारकर्ते संतोष भाकरेंनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com