Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar Speech : 'ते आले तर ठीक, अन्यथा दूर लोटण्यासाठी सर्वकाही करू' ; शरद पवारांचा रोख कुणाकडे ?

INIDA Alliance Meet In Mumbai : "सत्ता हातात आल्यानंतर भाजपचे पाय जमिनीवर नाहीत"

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : पूर्वी जमीनीवर पाय ठेवणारे सत्ता आल्यानंतर मात्र वाटेल ते निर्णय घेऊन लोकांच्या अडचणीत भर टाकत आहेत. आता अनेक लोक चुकीच्या मार्गाने गेले असून त्यांना योग्य रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करू; नाही आले तर दूर लोटण्यासाठी जे काही करायचे ते करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांनी दिला आहे. 'इंडिया'च्या मुंबईतील बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पवारांचा नेमका रोख कुणाकडे होता, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. (Latest Political News)

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंडखोर नेत्यांसह शरद पवारांची दोन वेळा भेट घेतली. या भेटीत त्यांनी पवारांचे मन वळवण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. या भेटींमुळे मात्र महाविकास आघाडीसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. यावर आपण भाजपविरोधातच काम करणार असल्याचे पवारांनी सांगूनही काँग्रेसने त्यांनी भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले होते. यानंतर मुंबईत झालेल्या इंडियाच्या बैठकीत समन्वय समितीत शरद पवारांचा सहभाग करण्यात आला आहे. यावेळी मोदी सरकारसह पवारांनी अजित पवारांनाही नाव न घेता इशारा दिला आहे.

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, "देशातील वेगवेगळ्या राज्याच्यां समस्या वेगळ्या आहेत. लोकांना अनेक अडणींना सामोरे जावे लागत आहे. तेथे शेतकरी, मजूर, कामगार, महिला आणि तरुणांच्या समस्या सुटल्या नाहीत. देशाची जबाबदारी मोठ्या विश्वासाने लोकांनी भाजपकडे दिली होती. आज मात्र तेच लोक भाजपविरोधात नाराजी व्यक्त करत आहेत. भाजपकडे मोठ्या मताधिक्य असूनही लोकांच्या समस्या सुटत नाहीत. सत्तेपूर्वी ज्या लोकांचे पाय जमीनीवर होते ते आता लोकांना अडचणीत आणण्याचे काम करत आहेत. हे त्यांच्या निर्णयातून दिसून येत आहे," अशी टीकाही पवारांनी भाजपवर केली.

इंडिया (INDIA) अंतर्गत देशातील २८ पक्ष एकत्र आले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी घमेंडिया म्हणाले होते. याचा समाचार घेताना पवार म्हणाले, "आम्ही एकत्र आल्यानंतर भाजपचा तिळपापड एक झाला. जमिनीवर पाय ठेवून काम करण्याची गरज असताना हे लोक जमिनीपासून दूर गेले आहेत. भाजपच्या नेत्यांकडून घंमेंडिया म्हणून टीका केली जाते. त्यांचे शब्दच सांगतात की खरे घमेंडिया कोण आहेत? लोकाच्या समस्या सोडवण्यासाठी विरोधी असूनही आम्ही एकत्र आलो आहोत."

आम्ही देशाला लुटणार नाही, असे वचनही पवारांनी देशवाशियांना दिले आहे. तसेच भाजपसह अजित पवारांना नाव न घेता इशाराही त्यांनी दिला. ते म्हणाले, "देशातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. इंडियाच्या वतीने एकच वचन करतो की आम्ही लुटणार नाही, चुकीच्या मार्गाने जणार नाही. चुकीच्या रस्त्याने गेले त्यांना योग्य मार्गावर आणण्याचे काम करू. ते आले नाही तर त्यांना दूर करू. त्यासाठी काहीही करण्यास तयार आहोत.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT