Ajit Pawar Speech: चंद्र-सूर्य असेपर्यंत कुणाचा बाप मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही;अजित पवारांनी ठणकावले

Ajit Pawar Speech In Mahayuti Sabha : मोदींचे नेतृत्व केवळ भारतीयांनीच नाही, तर अवघ्या जगाने मान्य केले आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Mahayuti News: जोपर्यंत चंद्र, सूर्य आहे; तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून कुणाचा बाप तोडू शकत नाही, हे निर्विवाद सत्य आहे. एमएमआरडीए क्षेत्रात त्यांना योग्य वाटणारी कामे ते सूचविणार आहेत. पण, शेवटी निर्णय मुख्यमंत्र्यांनाच घ्यायचा आहे. पण, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, अशी जनतेची दिशाभूल केली जात आहे, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षांकडून उपस्थित केलेल्या मुद्यांना दिले. (No one's father can separate Mumbai from Maharashtra until there is moon and sun: Ajit Pawar)

शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांचा मेळावा आज मुंबईत झाला. त्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले, तसाच सर्वधर्मियांसाठी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली राज्य कारभार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या वाटेवर चालण्याचा विचार आम्ही केला आहे.

Ajit Pawar
Mahayuti Meeting : आम्ही घड्याळाच्या चिन्हावरच निवडणुका लढवणार;तटकरेंनी महायुतीच्या बैठकीतून रणशिंग फुंकले

नवी पहाट, नवी सुरुवात या विचाराने आपल्याला पुढे जायचे आहे. मोदींचे नेतृत्व केवळ भारतीयांनीच नाही, तर अवघ्या जगाने मान्य केले आहे. सरकारमध्ये जाऊन आम्हाला दोन महिने होतील. एकदा सर्व्हे करण्यात येईल आणि बळीराजाला कुठे अडचणी आहेत, हे पाहून त्यांना मदत करण्यात येईल, असेही अजित पवार यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री म्हणाले की, आगामी काळात राज्य आणि देशाच्या विकासासाठी एकत्र येऊन नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करायचे आहेत. मागे काय झाले, हे आता उकरत बसू नका. अशा सभा झाल्या पाहिजे. प्रत्येक ठिकाणी परिस्थिती वेगळी आहे. काहीजण चुकीच्या बातम्या जाणीवपूर्वक पसरवत आहेत. सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विषय आहे. तिथेसुद्धा आपल्या जागा जास्त आल्या पाहिजेत. मुंबईनंतर सर्व जिल्ह्यात सभा घेतल्या जातील.

Ajit Pawar
Solapur Politics : भाजप खासदाराच्या बनावट जातप्रमाणपत्राची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याची मंत्रालयात बदली

नीती आयोगाने पाच शहर निवडली आहेत. प्रत्येक शहराचा विकास आखाडा तयार करण्याबरोबरच शहराचा आर्थिक आराखडा तयार करण्याचा कार्यक्रम नीती आयोगाने आखला आहे. त्यामध्ये मुंबई, वाराणसी, सूरत, विशाखापट्टणम या शहरांचा समावेश आहे. टप्प्या टप्पयाने सर्व शहरांचा समावेश त्यात असणार आहे. मात्र, या मुद्यावर जनतेची दिशाभूल केली जात आहे. काहींनी हुतात्मा स्मारकाजवळ जाऊन वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Ajit Pawar
INDIA Meeting In Mumbai : इंडिया आघाडीत मोठी घडामोड; काँग्रेस नेते नाराज, ‘जी-२३’मधील ‘या’ नेत्याची उपस्थिती ठरली कारणीभूत

चुकत असेल तर दाखवा. एखादी गोष्ट चुकली म्हणून आम्ही ती दुरुस्ती करू. राज्याच्या विकासावर भर देण्याचे प्रयत्न केले आहेत. गेल्या वर्षभरात काही प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रयत्न केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com