Ajit pawar, Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar Vs Ajit Pawar : मोदींना आव्हान देत शरद पवारांचा अजितदादांना इशारा

सरकारनामा ब्यूरो

Mumbai Political News : मुंबईत 'इंडिया'ची गुरुवार आणि शुक्रवारी अशी दोन दिवशी बैठक होणार आहे. यासाठी सहभागी झालेल्या पक्षांतील प्रमुख मुंबईत दाखल झाले आहे. यानंतर यजमान असलेल्या महाविकास आघाडीतील पक्षांतील नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलेल्या आव्हानातून उपमुख्यमंत्री अजित पवारांना इशारा दिला आहे. मोदींनी केलेल्या आरोपाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असे पवार म्हणाले. आमची भूमिका भाजपविरोधात असून फुटीरांना लोक जागा दाखवतील, असा टोलाही पवारांनी अजित पवारांना लगावला आहे. (Latest Political News)

राष्ट्रवादीवर नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) केलेल्या आरोपांबाबत पवारांना यावेळी छेडण्यात आले. यावर पवारांनी पंतप्रधान मोदींना फक्त आरोप न करता सखोल चौकशी करण्याचेही आव्हान केले. "भोपाळच्या भाषणात मोदींनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर भ्रष्ट्राचार आणि घराणेशाहीची टीका केली होती. राष्ट्रवादीवर टीका करताना त्यांनी राज्य शिखर बँक आणि इरिगेशन घोटाळ्यावर जोर दिला होता. देशाच्या प्रधानमंत्र्यांकडे माझा एकच आग्रह आहे की, जिथे सत्तेचा गैरवापर झाला असे त्यांना वाटते त्यांनी सखोल चौकशी करावी आणि वस्तुस्थिती समजापुढे ठेवावी. हतात सत्ता असल्याने त्यांनी केलेल्या आरोपांवर लवकरात लवकर अॅक्शन घ्यावी", असे थेट मोदींना पवारांनी आव्हान दिले आहे.

राष्ट्रवादी फुटीनंतर राज्यात (Sharad Pawar) शरद पवारांच्या भूमिकेबाबत संभ्रमाचे वातावरण आहे, याबाबत आपली भाजपविरोधातील भूमिका स्पष्ट असल्याचे पवारांनी सांगितले. ते म्हणाले, आमचे सहकारी फुटून सत्तेत सहभागी झाले हे खरे आहे. मात्र आमची भूमिका कायम आहे. आमचे कार्यकर्ते आमच्या सहकारी पक्षांत याबाबत काहीही संभ्रम नाही. त्या लोकांना राज्याचे मतदार २०२४ मध्ये त्यांची दाखवतील. आमची भाजपविरोधातील भूमिका कायम असून इंडियात विजयी होण्यासाठी काम करणार आहे", असे पवारांनी स्पष्टपणे सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT