Sharad Pawar On India Meeting: 'इंडिया' च्या दोन दिवसांच्या बैठकीत काय चर्चा होणार ? शरद पवारांनी थेट अजेंडाच सांगितला

India Meeting in Mumbai: इंडिया आघाडीत आता 28 राजकीय पक्ष सहभागी; शरद पवारांची माहिती
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Mumbai News: विरोधी बाकांवरच्या नेत्यांची टीम 'इंडिया' आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तिसरी बैठक घेत आहे. विरोधी नेत्यांच्या दोन दिवसांच्या बैठकीत मोदी-शाहांना सत्तेपासून रोखण्यासाठी अजेंडा ठरणार आहे.

एवढंच नाही तर या बैठकीत जागावाटपाचे सूत्र देखील ठरण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी देशातील जवळपास 28 राजकीय पक्ष सहभागी होणार आहेत. यासंदर्भाने झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी 'इंडिया' आघाडीच्या बैठकीचा अजेंडा सांगितला आहे.

इंडिया आघाडीत आधी 26 पक्ष होते, आता 28 राजकीय पक्ष सहभागी झाले असल्याची माहिती शरद पवारांनी पत्रकार परिषदेत दिली. "गेल्या दोन बैठकीत जागावाटपासंदर्भात चर्चा झाली. मात्र, मुंबईत होणाऱ्या दोन दिवसांच्या बैठकीत 'इंडिया आघाडी'चा सामूहिक कार्यक्रम काय असला पाहिजे, या संदर्भाने चर्चा होणार आहे. याच बैठकीत काही नेत्यांवर महत्वाची जबाबदारी देण्यावर देखील मंथन होणार आहे", असे शरद पवारांनी सांगितले.

Sharad Pawar
Radhakrishana Vikhe Patil: अजित पवारांच्या सत्तेतील 'एन्ट्री'चा पहिला फटका राधाकृष्ण विखेंनाच, 'या' समितीतून वगळले

विरोधकांच्या या आघाडीत मायावती नेमकी कुणाबरोबर जाण्याची भूमिका घेणार, याबाबत देखील पवारांनी भाष्य केले. मायावतींनी भाजपबरोबर सुसंवाद ठेवला आहे. मात्र, जो पर्यंत मायावती त्यांची भूमिका स्पष्ट करणार नाहीत. तो पर्यंत याबाबत बोलणे योग्य ठरणार नाही, असेही पवारांनी सांगितले.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com