Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar : महाराष्ट्रात 'मणिपूर' घडेल? शरद पवार नेमके काय म्हणाले?

Manipur And Maharashtra : मणिपूरचे विविध धर्माचे, भाषेचे लोक दिल्लीत आम्हाला भेटाले. त्यांनी तेथील विदारक चित्र कथन केले.

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : देशात धर्माधर्मात वाद होत आहेत, राज्यात दोन जाती एकमेकांसमोर ठाकल्या आहेत. याकडे मात्र सरकार गांभीर्याने घेत नसल्याची टीका वारंवार विरोधकांकडून केली जाते.

मणीपूर राज्य पेटले असताना त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आता तशाच गोष्टी राज्यात होतील की काय, अशी चिंता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वाशी येथे बोलताना व्यक्त केली. मात्र राज्यातील ऐक्याचा इतिहास अशा धार्मिक द्वेषला थारा देणार नाही, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वाशी येथे सामाजिक कार्यकर्ते मंगेश आमले यांच्या नेतृत्वात सामाजिक ऐक्य परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी शरद पवारांनी Sharad Pawar आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, मणिपूरबाबत देशाच्या पार्लमेंटमध्ये चर्चा झाली.

मणिपूरचे विविध धर्माचे, भाषेचे लोक दिल्लीत आम्हाला भेटाले. त्यांनी तेथील विदारक चित्र कथन केले. आता पिढ्यानुपिढ्या एकत्र असलेले लोक अस्वस्थ झाले आहेत. दोन जमातीत वाद झाला. शेती उद्ध्वस्त झाली. स्त्रीयांवर अत्याचार झाल्याचे विदारक चित्र त्यांनी आम्हाला सांगितले.

ऐवढे मोठे संकट एका राज्यावर आल्यानंतर राज्यकर्त्यांची जबाबदारी वाढते. त्यांनी तेथील वातावरण शांत करण्यासाठी, सामाजिक ऐक्य जपण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते. पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांनी त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही.

देशाच्या पंतप्रधानांना तिकडे जावे, लोकांना दिलासा द्यावा, असे वाटले नाही. या गोष्टी मणिपूरसह आजूबाजूच्या राज्यातही घडल्या. काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्येही तसेच घडले. आता अशा गोष्टी महाराष्ट्रात घडतात की काय, याची चिंता वाटते, असेही पवार म्हणाले.

देशाच्या इतिहासात अनेक राजे होऊन गेले. मात्र साडेतीनशे होऊनही कोणत्या राजाचे नाव घेतले जाते, ते म्हणजे शिवछत्रपती यांचे. त्यांचे राज्य कधीही भोसले यांच्या नावने ओळखले गेले नाही. ते हिंदवी राज्य, स्वराज्य म्हणूनच त्याची ओळख जाते.

त्यांच्या या दूरदृष्टीने राज्यात आजही सामाजिक ऐक्य टिकून आहे. मात्र त्याकाळातही ऐक्याला धक्का लागणाऱ्या गोष्टी घडल्या हे त्यांच्या राज्याभिषेकावेळी स्पष्ट झाले. आजही तसे घटक राज्यात कुठेना कुठे कार्यरत आहेत, याकडेही पवारांनी लक्ष वेधले.

समाजाच्या विकासासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी कसा पुढाकार घेतला याचेही उदाहरण यावेळी पवारांनी सांगितले. राज्यातील महापुरुषांनी समाजाचा उद्धार कसा होईल, याचा विचार केला. त्यांच्या विचारांनुसार राज्यातील ऐक्य आबाधित ठेवणे गरजेचे आहे.

विकासासाठी राज्यात स्थिरता येणे गरजेचे आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी पंचम जॉर्जकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर त्या पूर्ण करण्याचा आग्रह केला होता, याबाबतही पवारांनी माहिती दिली. देशात आणि राज्यातील सर्व समजात ऐक्य निर्माण करण्यासाठी ही ऐक्य परिषद महत्त्वाची ठरणार असल्याचे म्हणत आयोजक मंगेश आमले यांचे पवारांनी कौतुक केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT