Sharad Pawar News :  Sarkaernama
मुंबई

Sharad Pawar Calls Meeting: शरद पवार वाय. बी. चव्हाण सेंटरवर दाखल; कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष!

Sharad Pawar Reached YB Chavan Centre for Meeting: कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणाबाजी केली..

सरकारनामा ब्यूरो

NCP Vs NCP: अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीचा गट शिंदे - फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. अजित पवारांच्या बंडामुळे राज्यातील राजकारणात भूकंप आला आहे. यावर राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणाबाजी केली. जोरदार जल्लोष केला. (Latest Marathi News)

दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची आज मुंबईत बैठक आहे. दोन्ही गट बैठकांच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करत आहेत. या दोन्ही बैठकीसाठी राष्ट्रवादीचे आमदार मुंबईकडे रवाना झाले आहे. या बैठकीनंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे नेमके किती आमदार आहेत याचं चित्र आज स्पष्ट होणार आहे.

‘आम्हीच खरे राष्ट्रवादी’ असा दावा करणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व अजित पवार बुधवारी मुंबईत स्वतंत्र बैठकांद्वारे शक्तिप्रदर्शन करीत आहेत. भाजपला पाठिंबा देण्याबाबत ४० आमदारांच्या सह्यांचे आपल्याकडे पत्र आहे. त्यामुळे पक्ष व चिन्ह आमच्याकडेच असा दावा अजित पवार गटाने केला आहे. तर अनेक आमदार आमच्याकडे परत येत असल्याचा दाव शरद पवार गटाने केला आहे.

शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दाखल झाले आहेत. पवारांच्या या बैठकीला एकूण १२ आमदारांचे संख्याबळ असल्याचे समजत आहे. पवार यांच्या बैठकीसाठी आतापर्यंत ९ आमदार उपस्थित झाले आहेत. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे हे प्रमुख नेते उपस्थित झाले आहेत. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष दिसून आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT