Sharad Pawar News : शरद पवारांनी केली अजित पवारांच्या गटाची कोंडी; ज्यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत त्यांनीच फोटो...

Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे.
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली आहे. अजित पवार यांनी समर्थक आमदारांसह उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरावा, असे स्पष्ट केले आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्ममंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच आहेत, असे सांगितेल होते. तसचे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना शरद पवार यांचाही फोटो बॅनरवर लावाला असे आदेश दिले होते. मात्र, यानंतर आता शरद पवार यांनी कठोर भूमिका घेतली आहे.

Sharad Pawar News
Nana Patole News : ''प्रफुल्ल पटेल अमित शाहांनी दिलेली स्क्रिप्ट वाचत आहेत''

शरद पवार म्हणाले, 'माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरावा. मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, ज्यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आहे. त्या पक्षाने माझा फोटो वापरावा. अन्य कोणी परवानगी शिवाय फोटो वापरू नये, असे स्पष्ट केले. त्यामुळे आता अजित पवार यांच्या गटाला फोटो न वापरण्याचीच सूचना करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांनी खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई केली आहे. अशातच प्रफुल्ल पटेल यांनी मोठा धक्का देत नव्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यांच्याऐवजी सुनिल तटकरे नवे प्रदेशाध्यक्ष असतील, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले होते.

Sharad Pawar News
Shiv Sena MLA Disqualification: मोठी बातमी, 16 आमदार अपात्रतेबाबत ठाकरे गटाची याचिका; 'अध्यक्षांना लवकरात निर्णय...'

मात्र, अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या नियुक्त्यांना अर्थ नसल्याचे सांगितले होते. या सर्व घडामोडीनंतर आता शरद पवार यांनीच आपला फोटो परवानगीशिवाय न वापरण्याची सूचना केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com