Sharad Pawar–Ashish Shelar panel celebrates victory in MCA election; Jitendra Awhad and Milind Narvekar secure top posts. sarkarnama
मुंबई

Sharad Pawar–Ashish Shelar Yuti: शरद पवार- आशिष शेलार युतीचा बंपर फायदा; जितेंद्र आव्हाड उपाध्यक्ष अन् ठाकरेंच्या खास माणसानेही मारली बाजी!

MCA election Jitendra Awhad Vice President : एमसीएच्या निवडणुकीत शरद पवार- आशिष शेलार गटाच्या युतीने 16 पैकी 12 जागांवर विजय मिळवला आहे.

Roshan More

MCA Election : राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या नेत्यांची अनोखी युती एमसीएच्या निवडणुकीत पाहण्यास मिळाली. मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत शरद पवार- आशिष शेलार गटाची युती झाली होती. निवडणुकीत 16 पैकी 12 जागांवर विजय मिळवत पवार-शेलार युतीने आपली ताकद दाखवून दिली. आमदार जितेंद्र आव्हाड एमसीएचे नवे उपाध्यक्ष असणार आहेत.

शरद पवार गटाचे अजिंक्य नाईक यांची दोन दिवसापूर्वी उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांनी देखील बाजमी मारली आहे. त्यांना मतांचे द्विशत पार करत आले. या निवडणुकीत दोनशे मत घेणारे नार्वेकर हे चौथ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले. या कार्यकारी समितीमध्ये सर्वाधिक मते 247 संदीप विचारे यांना पडली.

एमसीएच्या अध्यक्षपदासाठी प्रसाद लाड यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या एक दोन तास आधी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्याच्यासह इतर उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अजिंक्य नाईक हे बिनविरोध अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला.

सर्वाधिक मतदान

एमसीएच्या निवडणुकीत 377 जणांना मतदानाचा अधिकार आहे. त्यातील 364 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यंदा सर्वाधिक मतदान झाल्याचे सांगितले जात आहे. सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसकर, सुनील गावसकर यांच्यासह वसीम जाफर, अजित आगरकर, झहीर खान यांनी मतदानाचा हक्क बजावला. राजकीय क्षेत्रातील शरद पवार, आदित्य ठाकरे, प्रसाद लाड, रवींद्र चव्हाण, रामदास आठवले, राहुल शेवाळे आदींनी मतदानाचा हक्क बजावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT