(Sharad Pawar)
(Sharad Pawar) Twitter@ANI
मुंबई

Sharad Pawar Retirement : शरद पवारांची पदावरुन पायउतार होण्याची घोषणा अन् वाय.बी चव्हाण सेंटरबाहेर कार्यकर्त्यांचा जनसागर

सरकारनामा ब्युरो

Sharad Pawar Retirement :  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (२ मे) आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होणार असल्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी, चाहत्यांनी त्यांच्या राजीनाम्याला प्रचंड विरोध केला.  (Sharad Pawar Latest News)

मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये  शरद पवार (Sharad Pawar) यांच्या लोक माझे सांगाती पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे आज प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याची घोषणा केली. पण त्यांच्या त्यांच्या या निर्णयामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी, चाहत्यांनी त्यांच्या राजीनाम्याला प्रचंड विरोध केला.  कार्यकर्ते, नेते त्यांना निर्णय मागे घेण्याची विनंती करत होते. कार्यकर्ते नेत्यांनी विनंती केल्यानंतर राष्ट्रवादीचा परिवार, ज्येष्ठ नेते मिळून आम्ही निर्णय घेऊ, असे सांगितलं. 

पण त्यानंतरही कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. शरद पवार यांनी अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याची घोषणा केल्यानंतरही जवळपास गेल्या तीन-चार तासांपासून वाय. बी. चव्हाण सेंटर बाहेर कार्यकर्त्यांची चांगलीच गर्दी जमली आहे. साहेबांनी निर्णय मागे घ्यावा, त्यांच्याशिवाय आम्हाला दुसरा कुणीही नको, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होताना दिसत आहे. कार्यकर्त्यांची मनधरणी केली. शरद पवार सिल्व्हर ओककडे निघाले असता अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला.  (Sharad Pawar Lok majhe sangati Latest news)

बराच वेळ लोटूनही कार्यकर्ते वाय बी चव्हाण सेंटर कार्यकर्त्यांचा एकच जनसागर लोटला आहे. राजीनाम्याचा निर्णय़ मागे घ्यावा, अशी सातत्याने मागणी केली जात आहे. अशात काही वेळापुर्वी खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधीपक्षनेते अजित पवार कार्यकर्ते जमले त्याठिकाणी आले होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी फोनवरुन शरद पवार यांचा कार्यकर्त्यांशी संवाद घडवून आणला, यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना जेवण करुन या अशी विनंती केली. आम्ही शरद पवार यांच्याशी चर्चा करतो आणि एक निर्णय घेतो, असं आश्वासनही दिलं. त्यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अजित पवार निघून गेले, तर सुप्रिया सुळे या कार्यकर्त्यांसोबतच बसून राहिल्या.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT