Sharad Pawar Resigns As NCP Chief : शरद पवारांनी निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी उपोषण; कार्यकर्ते भावूक..

NCP President Sharad Pawar Resign Live Updates : ठाण्यातील पचपाखाडी येथील राष्ट्रवादी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं उपोषण सुरू होणार आहे.
Sharad Pawar resigns as NCP chief : NCP President Sharad Pawar Resign Live Updates :
Sharad Pawar resigns as NCP chief : NCP President Sharad Pawar Resign Live Updates : Sarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar resigns as NCP chief : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षापदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघत आहेत. पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती करीत आहेत. मात्र याबाबत अजूनही शरद पवार फेरविचार करणार का? याबाबत अद्यापही सकारात्मक माहिती पुढे आली नाही. मात्र पक्षातील कार्यकर्त्यांना भरून आले आहे.

Sharad Pawar resigns as NCP chief : NCP President Sharad Pawar Resign Live Updates :
Sharad Pawar Retirement: "भाकरी फिरवण्याचे संकेत पण तवाच फिरवला, इतिहासाची पुनरावृत्ती.." ; राऊतांचं सूचक ट्वीट

अध्यक्ष शरद पवार यांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर आता, कार्यकरित्यांच्या भावना तीव्र आहेत. पवारांनी हा निर्णय मागे घ्यावं, त्यांनी अजूनही पक्षाची धुरा सांभाळावी, अशी भावना राष्ट्रवादीचे तमाम नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आहे. पवारांचा हा निर्णय आम्हाला मान्य नाही. राज्याला, देशाला आजही पवार साहेबांची गरज आहे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.

Sharad Pawar resigns as NCP chief : NCP President Sharad Pawar Resign Live Updates :
Arni APMC Election Analysis : ना पक्ष, ना आघाडी, जात ठरली सगळ्यात भारी !

दरम्यान, शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उपोषणास बसण्याचा पवित्रा घेतला आहे. ठाण्यातील पाचपाखाडी येथील राष्ट्रवादी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं उपोषण सुरू होणार आहे. यामुळे कार्यकरत्यांच्या भावना तीव्र आहे.

Sharad Pawar resigns as NCP chief : NCP President Sharad Pawar Resign Live Updates :
Buldhana District APMC: बाजार समित्यांमध्ये आघाडीचा डंका अन् सत्ताधाऱ्यांना धोक्याची घंटा !

दरम्यान, "पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार झालो असलो तरी, सार्वजनिक कार्यातून कुठेही दूर जाणार नाही. साठ दशकांहून अधिक काळ जनमानसांत काम करत आलोय आणि त्या सेवेत कोणताही खंड पडणार नाही. सार्वजनिक कार्यात मला अधिक वेळ देता येईल. मी कुठेही असेन, तिथे तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे उपलब्ध असेन," असेही शरद पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com