Sharad Pawar-Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

जयंत पाटलांच्या निलंबनाबाबत शरद पवारांचा अजितदादांना फोन

अजितदादांकडून पवार यांनी ‘सभागृहात नेमके काय झाले, याबाबत माहिती घेतली आहे

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांचे हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, पाटील यांच्या निलंबनाबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना फोन करून माहिती घेतली आहे. (Sharad Pawar's Phone call to Ajit Dada regarding the suspension of Jayant Patil)

दिशा सॅलियान आत्महत्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत गुरुवारी (ता. २२ डिसेंबर) एसआयटीची घोषणा केली. त्यावर विरोधकांना बोलण्याची संधी मिळावी, अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत होती. सत्ताधारी बाजूकडून या विषयावर १४ आमदार बोलले. मात्र, विरोधकांच्या वतीने शिवसेना आमदार भास्कर जाधव यांना बोलण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी होत होती. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर जयंत पाटील यांच्याकडून अपशब्द उच्चारला गेला. त्यामुळे पाटील यांचे अधिवेशन काळापुरते निलंबन करण्यात आले आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निलंबन झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना फोन केला. अजितदादांकडून पवार यांनी ‘सभागृहात नेमके काय झाले, याबाबत माहिती घेतली आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

सभागृहात जयंत पाटील यांचे अधिवेशन कालावधीपर्यंत निलंबन झाले, त्यानंतर शरद पवार यांची विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याबरोबर या विषयावर चर्चा केली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या वतीने आज विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार घालण्यात आला आहे. मात्र, विधान परिषदेतील कामकाजात महाविकास आघाडीचे आमदार सहभागी झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT