Jayant Patil
Jayant PatilSarkarnama

मोठी बातमी : जयंत पाटील ३० डिसेंबरपर्यंत विधानसभेतून निलंबित : विधानसभा अध्यक्षांना अपशब्द उच्चारणे भोवले

संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा ठराव मांडला. सत्ताधारी पक्षाने बहुमताने तो ठराव मंजूर केला आहे.
Published on

मुंबई : विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना नागपूरचे हिवाळी अधिवेशन (Winter session) संपेपर्यंत म्हणजेच येत्या ३० डिसेंबरपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी हा ठराव मांडला. सत्ताधारी पक्षाने बहुमताने तो ठराव मंजूर केला आहे. निलंबनाच्या कालावधीत जयंत पाटील यांना नागपूर आणि मुंबईतील विधीमंडळाच्या आवारात प्रवेश करता येणार नाही. (Big news: Jayant Patil Nagpur suspended for the duration of winter session)

विधानसभेत बोलताना शंभूराज देसाई यांनी आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार जयंत पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. सत्ताधारी पक्षाने तो बहुमताने मंजूर केला. या कालावधीत जयंत पाटील यांना नागपूर आणि मुंबई विधीमंडळाच्या आवारात वावरता येणार नाही.

Jayant Patil
जयंत पाटलांवर निलंबनाची टांगती तलवार : आक्रमक झालेले मुख्यमंत्री प्रचंड आग्रही

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सॅलियान आत्महत्या प्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे. त्यावरून विरोधक प्रचंड आक्रमक झाले. त्यांनी विधानसभा अध्यक्षांना यावर बोलू देण्याची मागणी केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नकार दिला. त्या गोंधळताच शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी ‘ तुम्ही एखाद्या सदस्याचा जीव घ्याल’ असे म्हटले. त्यानंतरही बोलण्यास परवानगी नाकारणाऱ्या अध्यक्षांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका’ असे विधान केले. त्यामुळे सभागृहातच एकच गोंधळ उडाला होता.

Jayant Patil
Disha Salian Case : आदित्य ठाकरेंची अडचण वाढणार; दिशा सॅलियन आत्महत्याप्रकऱणाची SIT मार्फत चौकशी होणार

त्यानंतर आक्रमक झालेल्या सत्ताधारी आमदारांनी जयंत पाटील यांचे निलंबन करण्याची मागणी केली. त्याच गोंधळात विधानसभा अध्यक्षांनी जयंत पाटीलसाहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी आणि विरोधकांचा गोंधळ पाहून अध्यक्षांनी विधानसभेचे कामकाज तहकूब केले.

Jayant Patil
शेवाळेंना चेंबूरहून अंधेरीला जाताना तीन तीन गाड्या का बदलाव्या लागतात? : युवा सेनेचा बोचरा सवाल

दरम्यान, जयंत पाटील यांच्या विधानावर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक झाली. त्यात जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करा, अशी मागणी खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. त्याबाबत विधानसभा अध्यक्षांच्या दालनात विचारविनिमय झाला. त्यानंतर जयंत पाटील यांच्या निलंबनाची घोषणा करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com