Sharad Pawar, Sunil Tatkare, Praful Patel News Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar News : शरद पवारांचा प्रफुल्ल पटेल अन् सुनील तटकरेंना इशारा; त्यांनी स्वत:हून कार्यवाही करावी अन्यथा...

Ajit Pawar News : अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार यांनी मांडली भूमिका

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar press conference : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भुकंप झाला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका घेतली आहे. यावेळी त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना इशारा दिला आहे.

पवार म्हणाले, पक्षाच्या चौकटीच्या बाहेर गेले, त्यांच्यावर कारवाईसंदर्भात भूमिका घ्यावी लागेल. ज्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली आहे, त्या प्रत्येकाबाबत निर्णय घ्यावा लागेल. सर्व नऊ लोकांबाबत निर्णय घेतला जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

पक्षाच्या धोरणाशी विसंगत भूमिका कुणी घेतली असेल, तर ती योग्य नाही, असे पवार म्हणाले. त्यासाठी पक्षातले प्रमुख लोक बसतील आणि त्याबाबतचा निर्णय घेतील. या संदर्भात मला महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि इतरांशी बोलावे लागेल. मी पक्षाचा राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे. मी काही पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली होती.

त्या पदाधिकाऱ्यावर मी जबाबदारी टाकली होती. उदाहरणार्थ, सरचिटणीस म्हणून खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांची नेमणूक केली होती. कार्याध्यक्ष म्हणून खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची मी नेमणूक केली आहे. माझे त्यांना सांगणे आहे की पक्षाच्या हितासाठी जी पावले त्यांनी टाकायला हवी होती, ती त्यांनी टाकली नाही. त्यांनी आपली जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही. त्यामुळे पक्षनेतृत्वाचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही. त्यामुळे त्यांनी स्वत:हून कार्यवाही करावी, नाहीतर मला कारवाई करावी लागेल, असा इशारा शरद पवार यांनी दिला.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला हे तुमच्या माध्यमातूनच कळले. राजीनामा देण्याचे ठिकाण विधानसभा अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे राजीनामा दिला असेल. लोकांमध्ये जाऊन भूमिका मांडणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांशी त्या गोष्टी पटणाऱ्या नाहीत.

आमदारांवर काय कारवाई होणार असा प्रश्न विचारला असता पवार म्हणाले, एक-दोन दिवसांमध्ये आम्ही भूमिका ठरवू. मला महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे. आमची खरी शक्ती ही कार्यकर्ते आणि सामान्य माणूस आहे. कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. पुन्हा संघटनेची बांधणी करणार, असल्याचा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT