Hasan Mushrif News : पवारांचे निकटवर्तीय हसन मुश्रीफही अजित पवारांसोबत; दुसऱ्यांदा घेतली मंत्रिपदाची शपथ

Ncp News : छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
Hasan Mushrif News :
Hasan Mushrif News :Sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे अजित पवार यांनी चार वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तसेच त्यांच्यासोबत छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे हसन मुश्रीफ यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विशेष करुन दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ व हसन मुश्रीफ यांच्या शपथविधीमुळे मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.

Hasan Mushrif News :
Ajit Pawar Oath Ceremony: अजित पवारांनी चार वर्षात तिसऱ्यांदा घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ...

दरम्यान, आज सकाळपासून अजित पवारांच्या देवगीरी बंगल्यावर समर्थक आमदारांची बैठक सुरू होती. या बैठकीनंतर पवार राजभवनावर दाखल झाले आहे. त्यामुळे अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील आहे.

Hasan Mushrif News :
Ajit Pawar Latest News : पहाटेच्या शपथविधीनंतर दुपारचा शपथविधी गाजणार; अजित पवार दुसऱ्यांदा भाजपाबरोबर...

त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूंकप घडला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्ष संघटनेची जबाबदारी द्या, अशी मागणी केली होती. त्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

मात्र, यामुळे पुन्हा एकाद पहाटेच्या शपथविधीनंतर दुपारचा शपथविधी गाजणार आहे. पहाटेच्या शपथविधीवरुन शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप-प्रत्योराप झाले होते. पहाचेच्या शपथविधीनंतर ८० तासात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांचे सरकार पडले होते. मात्र, आता दुपारी अजित पवार यांनी शपथविधी घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com