Voting For Legislative Council Election  Sarkarnama
मुंबई

Legislative Council Elections : शिक्षक-पदवीधर निवडणुकीत शेकापचा पाठिंबा कुणाला?

Legislative Council Elections : शिक्षक, पदवीधर मतदार संघ निवडणुकीची रणधुमाळी सुरू

सरकारनामा ब्यूरो

Legislative Council Elections : शिक्षक, पदवीधर मतदार संघ निवडणुकीची रणधुमाळी सध्या राज्यात सुरू आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण, नागपूर आणि औरंगाबाद येथील शिक्षक मतदार संघातील तसेच अमरावती आणि नाशिक येथील पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा दिला आहे.

सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं आहे. कोकण, नागपूर आणि औरंगाबाद येथील शिक्षक मतदार संघातील तसेच अमरावती आणि नाशिक येथील पदवीधर मतदार संघ या पाच मतदारसंघात येत्या ३० जानेवारीला निवडणूक होत आहे. या पाचही मतदारसंघातील निवडणूक महाविकास आघाडीने एकजुटीने लढविण्याचा निर्धार केला आहे.

कोकण शिक्षक मतदारसंघात भाई बाळाराम पाटील (शेकाप), अमरावती पदवीधर मतदारसंघात धीरज लिंगाडे (काँग्रेस), नागपूर शिक्षक मतदारसंघात सुधाकर आडवाले (काँग्रेस), औरंगाबाद शिक्षक मतदार संघात विक्रम काळे (राष्ट्रवादी), आणि नाशिक पदवीधर मतदारसंघात शुंभागी पाटील (शिवसेना), या महाविकास आघाडीच्या पाचही उमेदवारांना भारतीय शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, या सर्वांच्या विजयासाठी शेकाप पक्षाचे कार्यकर्ते तसेच शिक्षक, पदवीधर, विद्यार्थी, युवक अशा सर्व आघाड्यांवरील कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे निर्देश पक्षाचे सरचिटणीस आम भाई जयंत पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे आता ३० जानेवारीला निवडणूक पार पडल्यानंतर निकाल लागल्यावरच कोण गुलाल उधळणार हे स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT