मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली होती. पॉर्न फिल्मची निर्मिती आणि वितरण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. कुंद्रा याची दोन महिन्यांनंतर काराग़हातून सुटका झाली होती. यानंतर त्या दोघांनी आता मोठं पाऊल उचललं आहे.
कुंद्रा (वय 45) याला पॉर्न फिल्म रॅकेटप्रकरणी 19 जुलैला अटक झाली होती. या प्रकरणात एकूण 12 आरोपी आहेत. अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन त्यांचे वितरण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कुंद्रा याला सुरवातीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. नंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कुंद्रा असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी कुंद्राकडून 48 टीबी डेटा जप्त केला असून, यात अश्लील फोटो, व्हिडीओंचा समावेश आहे.
या प्रकरणात मुंबई पोलिसांनी १ हजार ४०० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. यानंतर त्याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले असून, तपासही पूर्ण झाला आहे, त्यामुळे जामीन मिळावा, अशी विनंती त्याने न्यायालयाकडे केली होती. अखेर न्यायालयाने त्याला जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. यानंतर तब्बल दोन महिन्यांनी 21 सप्टेंबरला कारागृहातून सुटला होता.
राजची सुटका झाल्यानंतर महिनाभराने त्याने आणि शिल्पाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी अभिनेत्री शेर्लिन चोप्रा हिच्याविरुद्ध तब्बल 50 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस बजावली आहे. खोटे आणि बोगस आरोप करून शेर्लिनने राज आणि शिल्पाची बदनामी केली असून, या प्रकरणी तिने विनाशर्त माफी मागावी आणि 50 कोटी रुपायांची नुकसाना भरपाई द्यावी, असेही नोटिशीत म्हटले आहे. शेर्लिन हिने राज कुंद्रावर अनेक गंभीर आरोप केले होते.
आता तिने सात दिवसांत माफी मागावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. सर्व आघाडीची वृत्तपत्रे आणि डिजिटल माध्यमांमध्ये ही माफी जाहीरपणे मागावी, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, मागील आठवड्यात शेर्लिन चोप्राने शिल्पा आणि राज यांच्या विरोधात जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या दांपत्याने फसवणूक केल्याचा आरोप तिने केला होता. छळवणूक आणि धमकावल्याचा आरोपही तिने केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.