Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath Shinde  Sarkarnama
मुंबई

शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने : पुन्हा एकदा संघर्ष

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातला संघर्ष न्यायालयात सुरू असताना आता ही लढाई रस्त्यावरही दिसत आहे. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने येऊन राडा झाला होता. आता धारावी मध्ये शिंदे गट आणि उद्धव गटात काल रात्री पुन्हा बाचाबाची झाली.

धारावी मध्ये शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर व विभाग प्रमुख गिरीष धानुळकर यांच्या उपस्थितीत विभागातील शिंदे गटाचे पदाधिकारी निवड व आढावा बैठकीसाठी बैठक घेण्यात आली होती. त्याचवेळी ठाकरे गटातील देवीची मिरवणूक जात असताना शिंदे गटांकडून धारावी पुनर्विकास संदर्भात मोठमोठ्या घोषणाबाजी करण्यात आल्या, त्यावेळी प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटाकडून देखील घोषणाबाजी करण्यात आली, तेव्हा हा वाद झाला.

यावेळी पोलीस उपस्थित असल्याने हा वाद थोडक्यात वाद सुटला. या प्रकरणी धारावी पोलीस स्टेशनमध्ये राजेंद्र सूर्यवंशी, चेतन सूर्यवंशी, मुत्तू पठाण या तीन शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज ठाकरे गटातील शिवसैनिकांना धारावी पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना समन्स देण्यात आले. त्याचप्रमाणे शिंदे गटालाही नोटिसा बजावून हा वाद मिटवून टाकला असल्याचं विठ्ठल पवार यांनी सांगितलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT