बाप नंबरी तर बेटा दस नंबरी : मेहबूब शेख यांची शिंदेवर बोचरी टीका

Mehaboob Shinde : मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांच्या अंगात घुसलं आहे की, श्रीकांत शिंदे यांच्या अंगात घुसलं आहे.
Mehaboob Shaikh
Mehaboob ShaikhSarkarnama
Published on
Updated on

वर्धा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसून खासदार श्रीकांत शिंदे काम करत असल्याचा फोटो व्हायरल झाला. यावर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी टीका केली. 'महाराष्ट्राचं नेतृत्व यशवंतराव चव्हाण साहेबांपासून, पवारसाहेब, वसंतदादा अशा महारथींनी केले. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर त्यांचं पोरग बसतो. म्हणजे हे असं झालं की, बाप नंबरी बेटा दस नंबरी, अशी बोचरी टीका शेख यांनी केली. वर्धा जिल्ह्यात 'शरद युवा संवाद यात्रे'दरम्यान आले असताना त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली.

मेहबूब शेख म्हणाले, मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर बसून मुलाने काम करणं, हे महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. उथळ पाण्याला खळखळाट अशी अवस्था श्रीकांत शिंदेची झाली आहे. म्हणजे मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांच्या अंगात घुसलं आहे की, श्रीकांत शिंदे यांच्या अंगात घुसलं आहे. एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली तो निर्णय पुत्र प्रेमापोटी केल्याच आता समोर यायला लागलं आहे. श्रीकांत शिंदेच्या राजकीय भविष्यासाठी एकनाथ शिंदे अस्थिर होते, अशी दबक्या आवाजातं चर्चा होती. कुठंतरी आज श्रीकांत शिंदेच्या देहबोली आणि वागण्यातून हे समोर येत आहे.

Mehaboob Shaikh
राष्ट्रवादीकडून व्हायरल फोटोवर श्रीकांत शिंदेचं स्पष्टीकरण : 'ते तर घरचं कार्यालय...'

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्याचे प्रवक्ते रविकांत वर्पे यांनीही श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला फोटोच ट्विट केला. ''खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे .हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर?' असे ट्विट करत शिंदे सरकारवर निशाणाही साधला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com