Sharad Pawar- Eknath Shinde  Sarkarnama
मुंबई

Mumbai Political News : शरद पवारांची यशस्वी खेळी; शिंदेंचा बडा नेता राष्ट्रवादीच्या गळाला

अनुराधा धावडे

Mumbai Politics : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला गट अधिक बळकट करण्यासाठी ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के देत साम, दाम, दंड, भेद असे सर्व मार्ग अवलंबताना दिसत आहेत, पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे गटाचा मोठा नेताच राष्ट्रवादीच्या गळाला लावला आहे.

शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिंदे गटाची साथ सोडली असून, ते उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता पांडुरंग बरोरा हे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशीही माहिती आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पांडुरंग बरोरा यांनी २०१९ मध्ये तत्कालीन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा देत बरोरा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला आणि शिवसेनेत प्रवेश केला. बरोरा यांचे वडील महादू बरोरा हेही चार टर्म शहापूर विधानसभेचे आमदार होते. शहापूर तालुक्यात त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे आजही त्यांचा शहापूर परिसरात दबदबा आहे.

नाराजीच्या चर्चांनंतर पुढचा निर्णय

विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून शरद पवार पुन्हा मैदानात उतरले आणि त्यांनी स्वत:हून पक्षबांधणीला सुरुवात केली. त्यामुळे राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेकजण पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे दिसत आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर बरोरा शिंदेंसोबत गेले खरे, पण काही दिवसांपासून ते नाराज असल्याच्या चर्चाही शहापूरच्या राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या, पण शरद पवार यांना त्यांची नाराजी दूर करण्यात यश आले आहे. त्यामुळे ते लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

शहापूरमध्ये सध्या दौलत दरोडा हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असून, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्थन दिले आहे. त्यामुळे शरद पवार आता दरोडा यांच्या विरोधात पांडुरंग बरोरा यांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.

Edited By -Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT