Supreme Court Collegium List : सात न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी शिफारस; मुंबई उच्च न्यायालयासाठी कोण ?

Dhananjay Chandrachud : महिलांचे प्रतिनिधित्व वाढले...
Supreme Court Collegium List :
Supreme Court Collegium List :Sarkarnama
Published on
Updated on

Supreme Court Collegium List : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मंगळवारी पाटणा आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीश नियुक्तीसाठी सात नावांची शिफारस केली. कॉलेजियमने रुद्र प्रकाश मिश्रा आणि रमेशचंद मालवीय यांची पाटणा उच्च न्यायालयातील न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Supreme Court Collegium List :
Mumbai NCP News: मुंबईसाठी शरद पवारांचा मोठा निर्णय; राखी जाधव यांच्यावर सोपवली 'ही' जाबाबदारी

दुसऱ्या एका निर्णयात कॉलेजियमने राजेंद्र कुमार वाणी, प्रमोद कुमार अग्रवाल, बिनोद कुमार द्विवेदी, देवनारायण मिश्रा आणि गजेंद्र सिंह यांना मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याची शिफारस केली आहे.

यापूर्वी, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने विविध उच्च न्यायालयांचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्तीसाठी 13 नावांची शिफारस केली होती. यामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून नियुक्तीसाठी शालिंदर कौर आणि रविंदर दुडेजा यांच्या नावांचा समावेश आहे. कॉलेजियममध्ये न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचाही समावेश आहे.

Supreme Court Collegium List :
CJI D. Y. Chandrachud: सरन्यायाधीश असलेल्या धनंजय चंद्रचूड यांचे असे आहे वैयक्तिक आयुष्य !

दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून नियुक्तीसाठी शालिंदर कौर आणि रविंदर दुडेजा यांच्या नावाची शिफारस केली होती. दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी आपल्या दोन वरिष्ठ सहकाऱ्यांशी सल्लामसलत करून 30 मे रोजी काही नावांना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्याची शिफारस केली होती.

महिलांचे वाढलेले प्रतिनिधित्व

न्यायाधीश निवडीमध्ये सर्वसमावेशकतेसाठी खंडपीठात महिलांचे अधिकाधिक प्रतिनिधित्व असण्याची गरज असल्याचे कॉलेजियमने म्हटले होते. कौर 30 सप्टेंबर 2023 रोजी दिल्ली उच्च न्यायिक सेवेतून निवृत्त झाल्याची माहिती आहे. कॉलेजियमने सांगितले की, 'अधिकाऱ्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे आणि त्यांच्याकडे क्षमता आणि काम करण्याची इच्छाशक्ती दोन्ही आहे. ते दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्तीसाठी योग्य असल्याचे कॉलेजियमचे मत आहे.

केरळ उच्च न्यायालयासाठी पाच न्यायिक अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस

दुसऱ्या एका निर्णयात, कॉलेजियमने केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्तीसाठी पाच नावांची शिफारस केली. यामध्ये एम. बी. स्नेहलता, जॉन्सन जॉन, जी. गिरीश, सी. प्रतिपकुमार आणि पी. कृष्ण कुमार यांच्या नावांचा समावेश आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी बढतीसाठी अभय मंत्री, श्याम छगनलाल चांडक आणि नीरज प्रदीप धोटे या तीन नावांचीही शिफारस केली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com