Palghar News : शिवसेनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या लोकप्रियतेची जाहिरात, त्यानंतर शिवसेनेच यू टर्ननंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पालघरमधील शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. मात्र, पालघरच्या कार्यक्रमाला जाताना ते एकच गाडीतून जाण्याऐवजी वेगवेगळ्या गाड्यातून कार्यक्रमस्थळी गेले, त्यामुळे त्या जाहिरातीमुळे पडलेली फूट अजूनही सांधली गेली नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. (Shinde-Fadnavis went to the event venue in Palghar in a separate car)
शिवसेनेकडून राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये देशात नरेंद्र राज्यात शिंदे अशी जाहिरात देण्यात आली होती. त्याचवेळी एका सर्व्हेक्षणात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापेक्षा जादा पसंती असल्याचे दर्शविण्यात आले होते. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर कार्यक्रमाला एकत्र जाणे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी टाळले होते. भाजपच्या नेत्यांकडून तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली होती.
भाजपच्या (BJP) रिॲक्शनंतर शिंदे गटाने दुरुस्ती केलेली जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात शिंदेबरोबर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो छापण्यात आला होता. तसेच महायुतीचे सरकार असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही दोन्ही गटात वातावरण गरमच होते. त्यात खासदार अनिल बोंडे यांच्या विधानाची भर पडली आणि टीकाटिपण्णी वाढली. (Shivsena-BJP Dispute)
त्या वादानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे आज पालघरमधील ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. व्यासपीठावर हे दोघे एकत्र आले खरे पण, तत्पूर्वी एक नाट्यमय घडामोड घडली. कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी शिंदे-फडणवीस एकत्र निघाले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र जाण्यासाठी फडणवीस यांना हातानेच खुणवले. मात्र, फडणवीसांनी तुम्हा चला असे म्हणून बाजूच्या गाडीकडे गेले. त्या ठिकाणी ते उभ्या असलेल्या गाडीतून ते कार्यक्रमस्थळाकडे गेले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे दोन वेगवेगळ्या गाड्यांमधून कार्यक्रमाला गेले. मात्र, यापूर्वी झालेल्या कार्यक्रमावेळी ते अनेकदा एकत्र आलेले आहेत. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनावेळी तर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाडी चालवली होती. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला दोघांनी स्वतंत्रपणे जाणे चर्चा विषय ठरलेला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.