NCP Meeting News : मुंबईच्या बैठकीत बाबा गुजर यांनी लढवला रामटेकचा किल्ला !

Baba Gujar : बाबा गुजर यांनी रामटेक मतदारसंघावर दावा ठोकला आहे.
Ramtek
RamtekSarkarnama

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या तिन्ही पक्षांनी मतदारसंघांवर दावे ठोकणे सुरू केले आहे. यावरून निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. (All the three parties have started staking their claims on the constituencies)

नुकतीच मुंबईला राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक झाली. या बैठकीत नागपूरचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी रामटेक मतदारसंघावर दावा ठोकला आहे. तसे पाहता, राष्ट्रवादी काँग्रेसला विदर्भातील चार लोकसभा मतदारसंघ हवे आहेत. तशी मागणी काल (ता. १४) मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत करण्यात आली. यात रामटेक, वर्धा, गडचिरोली आणि अमरावती लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

रामटेक, गडचिरोली आणि वर्धा लोकसभा मतदारसंघात सातत्याने काँग्रेस पराभूत होत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसला संधी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, नवनियुक्त कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आली. रामटेकसाठी नागपूर जिल्ह्यातील सुमारे पन्नास पदाधिकारी मुंबईत धडकले होते.

रामटेकमध्ये शिवसेनेकडे नेतृत्वच शिल्लक राहिले नाही. खासदार कृपाल तुमाने आणि आमदार आशिष जयस्वाल शिंदे सेनेत सहभागी झाले आहेत. काँग्रेसचे दोन आमदार आहेत. दोन जागांपैकी काटोलमध्ये राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत रामटेकवर राष्ट्रवादीचा भक्कम दावा करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रामटेकची बाजू नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी मांडली.

Ramtek
NCP Nagpur News : ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत उफाळली गटबाजी, फायदा भाजपला !

बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार, (Ajit Pawar) छगन भुजबळ, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, (Anil Deshmukh) दिलीप वळसे पाटील हे प्रमुख नेते उपस्थित होते. नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांपैकी माजी खासदार सुबोध मोहिते, माजी आमदार प्रकाश गजभिये, रमेश फुले, अविनाश गोतमारे, सतीश शिंदे, राजाभाऊ ताकसांडे ईश्वर बाळबुधे, सलील देशमुख, बंडोपंत उमरकर, अनिल साठवणे, विलास कांबळे सचिन आमले, किशोर चौधरी आदी उपस्थित होते.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com