Maharashtra Legislative Assembly sarkarnama
मुंबई

Maharashtra Assembly : शिंदे सरकारची आज कसोटी : ८ मंत्र्यांवर अतिरिक्त खात्यांची जबाबदारी

Maharashtra Assembly : आजपासून सुरु होत असलेल्या अधिवेशनात आपल्या मुळ विभागाचे कामकाज पाहून हे मंत्री अतिरिक्त जबाबदारी सांभाळणार आहेत

सरकारनामा ब्युरो

पुणे : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार झाला आहे. शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे. आता शिंदे गटातील (shinde group) ८ मंत्र्यांकडे अतिरिक्त खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आजपासून सुरु होत असलेल्या अधिवेशनात आपल्या मुळ विभागाचे कामकाज पाहून हे मंत्री अतिरिक्त जबाबदारी सांभाळणार आहेत. उदय सामंत (माहिती व तंत्रज्ञान), शंभुराज देसाई (परिवहन), दादा भुसे (पणन), संजय राठोड (सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य), तानाजी सावंत (मृदू आणि जलसंधारण),अब्दुल सत्तार(मदत व पुनवर्सन, आपत्ती व्यवस्थापन), दीपक केसरकर( पर्यावरण आणि वातावरणातील बदल), संदीपान भुमरे (अल्पसंख्याक व औकाफ) अशी या मंत्र्यांकडे अतिरिक्त जबाबदारी आहे.

शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर आज पहिल्यावहिल्या पावसाळी अधिवेशनाला सामोर जात आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर मुख्यमंत्री आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता एकाच पक्षाचे मात्र, विरोधकांच्या भूमिकेत दिसणार असल्याने या अधिवेशनाला शिंदे सरकार कसे सामोरे जाणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यातील राजकीय नाट्यांनतर शिवसेनेतील 40 आमदारांनी वेगळा गट स्थापन करत, भाजपसोबत सरकार स्थापन केले. यामुळे गेले काही दिवस राज्यातील राजकारण वातावरण तापले आहे. नव्या सरकारचे 18 कॅबिनेट मंत्री विरोधकांना कसे तोंड देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. दोन महिन्यापूर्वी सरकारमध्ये असलेली महाविकास आघाडी शिंदे यरकारला कशी आणि कोणत्या मुद्द्यावरुन घेरते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT