Aaditya Thackeray : ठाकरेंनी शिंदे सरकारला डिवचलं ; अधिवेशनापूर्वीच वात पेटवली

Aaditya Thackeray : विधानसभेत शिवसेनेतील दोन्ही गट आमनेसामने आल्यानंतर राडा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Aaditya Thackeray Latest News, Eknath Shinde Latest News
Aaditya Thackeray Latest News, Eknath Shinde Latest NewsSarkarnama

पुणे : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर प्रथमच होणाऱ्या अधिवेशनात (Maharashtra Assembly Session) शिवसेनेचे दोन गट समोरासमोर येणार आहेत. दोन गटांमध्ये जोरदार 'सामना' रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Maharashtra Assembly Session)

शिवसेनेत फूट पाडून शिंदे गटाने शिवसेनेला आव्हान दिले आहे. भाजपसोबत सत्ता स्थापन करुन शिंदे गटातील (Eknath Shinde camp) अनेक आमदारांना मंत्रिपदं मिळाली आहेत. मात्र, पहिल्याच अधिवेशनात त्यांना उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार विरोधाचा सामना करावा लागण्याची चिन्हं आहेत.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी काल (मंगळवारी) रात्री उशीरा एक ट्विट करून त्याचे संकेत दिले. या टि्वटमध्ये आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाच्या आमदारांवर बोचरी टीका केली आहे. त्यामुळे आता विधानसभेत शिवसेनेतील दोन्ही गट आमनेसामने आल्यानंतर राडा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

आपल्या ट्विटमधून आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा 'गद्दार' म्हणून डिवचलं आहे.आता अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात आदित्य ठाकरे शिंदे गटाच्या आमदारांवर तुटून पडणार का, हे पाहावे लागेल.

Aaditya Thackeray Latest News, Eknath Shinde Latest News
Vinayak Mete : मेटेंच्या अपघाताला वेगळं वळण, चालक वाघमारे यांचा नवा खुलासा

"काही गद्दार आमदारांची भाषा ऐकून, प्रश्न पडतो की गुंडगिरी आणि सत्तेची नशा एवढी आहे का, की त्यांच्या नव्या पक्षाचा आणि सरकारचा अंकुश नाही? जनतेला अशा भाषेत धमकावून काय सांगायचं आहे? हा सत्तेचा माज आहे की, काही न मिळाल्याचे नैराश्य?" असे टि्वट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

नतद्रष्ट मंडळींच्या कपटी कारस्थानामुळे ‘मविआ’ सरकार (Mahavikas Aghadi) कोसळले. शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis Govt) सरकार विकासकामांना कुठेही महत्व देत नसून केवळ राजकारणावर या सरकारचे लक्ष केंद्रित असल्याचा घणाघात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी काल (मंगळवारी) एका कार्यक्रमात केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com