Actor Govinda sustains bullet injury in leg, taken to hospital Sarkarnama
मुंबई

Actor Govinda: बंदुकीची गोळी लागल्याने शिवसेना नेता, अभिनेता गोविंदा जखमी

Mangesh Mahale

शिंदे गटाचे नेते, अभिनेता गोविंदा (Actor Govinda) याच्या पायाला बंदुकीची गोळी लागल्याची माहिती समोर येत आहे. स्वतःकडील बंदूक साफ करत असताना अनावधानाने स्ट्रीगर दाबले गेल्याने बंदुकीतून गोळी सुटली, ती त्याच्या पायाला लागली. (Actor Govinda sustains bullet injury in leg, taken to hospital)

जखमी झालेल्या गोविंदाला जवळच्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. या प्रकरणाचा अधिक तपास जुहू पोलीस करीत आहेत. त्याची बंदुक पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. कुटुंबातील सदस्यांकडे पोलीस विचारपूस करीत आहेत.

गोविंदा याच्याकडे परवानाधारक पिस्तुल आहे.सकाळी बाहेर जाण्यासाठी गोविंदा आपल्या गाडीने निघाला होता. त्यावेळी गाडीत बसताना गोविंदा यांच्याकडील पिस्तुलमधून चुकून गोळी सुटली आणि ती थेट पायात शिरली. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

अभिनेता, माजी खासदार गोविंदाने २८ मार्च २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. गोविंदा पूर्वी राजकारणात होता. त्याने २००४ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती.

त्या निवडणुकीत भाजपाच्या राम नाईक यांचा पराभव करत गोविंदाने संसदेत प्रवेश केला होता. मात्र २००९ नंतर गोविंदाने राजकारणाला रामराम करत पुन्हा एकदा बॉलिवूडकडे मोर्चा वळवला. मात्र बॉलिवूडमधील सेकेंड इनिंगमध्ये अपयशी ठरलेल्या गोविंदाने आता पुन्हा एकदा राजकारणाचा मार्ग स्वीकारला असल्याचे दिसते.

गोविंदाने शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर "सरकारच्या विकास कामांवर प्रभावित होऊन गोविंदा पक्षात आलेले आहेत. सरकारची कामे गोविंदा जनतेपर्यंत पोहोचवतील. ज्यातून महायुतीला फायदा होईल," असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

आता १४ वर्षानंतर मी पुन्हा सक्रिय राजकारणात आलो आहे. हा ईश्वरी कृपेचा भाग आहे. विश्वातील सर्वोत्तम फिल्म सिटी साकारण्याचे काम आदरणीय एकनाथ शिंदे यांच्याबरोबर पूर्ण करता येईल, असा विश्वास गोविंदा यांनी पक्षप्रवेशाच्या वेळी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT