Satej Patil: महाविकास आघाडीत जागांची अदलाबदल होणार; काँग्रेस आमदाराचे मोठे वक्तव्य

Mahavikas Aghadi meeting assembly election 2024:कोल्हापूरमध्ये किती जागा हव्या आहेत, हे जाहीरपणे मी बैठकीत बोललेलो आहे. आताच उघडपणे बोलणं संयुक्त नाही. त्याला अधिक फाटे फुटत जातात, त्यामुळे ऐनवेळी मी नक्कीच सांगेन.
Satej Patil
Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: जागा वाटपात संदर्भात महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक नुकतीच मुंबई झाली. बैठकीनंतर काल (सोमवारी) कोल्हापुरात काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी बाबत विचारले असता पाटील यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) ज्या पक्षाची ताकद आहे. त्या पक्षाला तो मतदारसंघ सोडण्यात येईल, तर परिस्थितीनुसार ज्या त्या पक्षातील उमेदवार जागा मिळालेल्या पक्षाला देण्यात येतील, असे स्पष्ट अदलाबदलीचे संकेत सतेज पाटील यांनी दिले आहेत.

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणाचे इन्कमिंग होणार आहे का या प्रश्नावर बोलताना सतेज पाटील यांनी, राज्यात सर्वत्र इनकमिंग सुरू आहे. मात्र, सध्या काँग्रेस भरगच्च भरली असून काँग्रेस सध्या हाऊसफुल आहे. परंतु कोणी आलं तर त्यांचं स्वागतच करणार असल्याचं पाटील म्हणाले आहेत.

Satej Patil
MNS News: देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात मनसेचा उमेदवार ठरला?

कोल्हापूरमध्ये किती जागा हव्या आहेत, हे जाहीरपणे मी बैठकीत बोललेलो आहे. आताच उघडपणे बोलणं संयुक्त नाही. त्याला अधिक फाटे फुटत जातात, त्यामुळे ऐनवेळी मी नक्कीच सांगेल, असं आमदार सतेज पाटील म्हणाले.

राहुल गांधी करणार छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरण

विधानसभा निवडणुकीला काही दिवसांचा अवघी शिल्लक राहिल्याने प्रचारासाठी अनेकांची लगबग सुरू झाली आहे. काँग्रेसकडून येत्या 5 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीच्या रणशिंग फुंकले जाण्याची तयारी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील सर्वच नेते राहुल गांधी यांच्या दौऱ्यानिमित्त उपस्थित राहणार आहेत.

4 ऑक्टोंबर रोजी कसबा बावडा येथील भगवा चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बहु शस्त्रधारी पुतळ्याच्या अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे. 5 ऑक्टोबरला संविधान न्याय संमेलनाला गांधी उपस्थिती लावणार आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेसकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि खासदार शाहू महाराज यांनी तयारीचा आढावा घेतला. 5 ऑक्टोबरला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती समाधी स्थळावर राहुल गांधी अभिवादन करणार आहेत. संविधान न्याय संमेलनाला ते उपस्थित राहणार असून नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com