Mira Bhayandar : आमदार गीता जैन यांनी अभियंत्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनधिकृच बांधकामावर तोडक कारवाई केल्याप्रकरणी आमदार जैन यांनी अभियंत्याला मारहाण केल्याचं समोर येत आहे. महिलेचा अपमान केल्यामुळे संताप अनावर झाल्यानंतर जैन यांनी मनपा अभियंत्याला शिवीगाळ करत मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे.
आमदार गीता जैन या मिरा भाईंदर(Mira Bhayandar) च्या माजी महापौर असून आमदार आहेत. जैन यांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अभियंत्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी( दि.२०) दुपारी अतिक्रमण विभागाच्या कारवाईवेळी हा जैन यांनी अभियंत्याला शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहेत.
या व्हिडीओत आमदार गीता जैन(Geeta Jain) या अतिक्रमण विभागाच्या तोडक कारवाईवरुन मनपा अभियंत्याची चांगलीच खरडपट्टी काढताना दिसत आहे. यावेळी त्या पावसाळ्यात अतिक्रमण विभागाची कारवाई करु नये असा महापालिकेचा अध्यादेश असताना ही महापालिका दोन दोन इंजिनिअर पाठवून ही कारवाई का करत आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच यावेळी त्यांनी ही कारवाई करताना घरतील महिला, मुलंबाळं तुमच्या कारवाईनंतर रस्त्यावर येतील. तुम्हांला थोडी देखील माणुसकी आहे की नाही अशी विचारणा करतानाच अभियंत्याला मारहाण करताना दिसत आहे.
याबाबत जैन म्हणाल्या, जूनमध्ये कुठलंही कायदेशीर किंवा बेकायदेशीर घर तोडायचं नाही असा अध्यादेश आहे. तरी देखील माझ्या मतदारसंघात अतिक्रमण(Encroachment) कारवाई सुरु होती. याबाबत विचारणा करण्यासाठी संबंधित अभियंत्याला मी त्याठिकाणी बोलावलं. दोन दिवसांपूर्वी घरमालकानं स्वतःहून अतिक्रमण काढण्याची तयारी दर्शवली होती.
मात्र, जेसीबी आणून घरातील महिला, मुलाबाळांना बाहेर काढण्यात येत असताना हा इंजिनिअर हसत होता. म्हणून माझा संताप अनावर झाला आणि हात उचलला गेला. कुणाची तरी सुपारी घेऊन ही कारवाई करण्यात येत असल्याचा आरोपही आमदार जैन यांनी यावेळी केला. महिलेचा अपमान होताना माझ्याविरोधात कितीही तक्रारी झाल्यातरी मला काहीही फरक पडणार नाही. असंही आमदार गीता जैन यांनी यावेळी सांगितलं.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.