Jayant Patil News : राष्ट्रवादीने केलेल्या सर्व्हेतून मोठी माहिती समोर; पक्षाला अनेक मतदारसंघात...

NCP Meeting in Mumbai News : असत्यावर आधारीत सर्व्हेक्षणाच्या बातम्या राज्यात येत आहेत.
 Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

NCP News : असत्यावर आधारीत सर्व्हेक्षणाच्या बातम्या राज्यात येत आहेत. अलीकडे होणाऱ्या सर्व्हेक्षणामध्ये काही तथ्य दिसत नाही. आम्ही ज्याठिकाणी सर्व्हेक्षण केले तिथे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) बळकट असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ज्या निवडक मतदारसंघांचे सर्व्हेक्षण पक्षाकडून करण्यात आले आहे, त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकांचा मोठा पाठिंबा मिळत, असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितेल.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांची आढावा बैठक आज (ता.२०) राष्ट्रवादी भवन, मुंबई (Mumbai) येथे संपन्न झाली. बैठक संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. महाराष्ट्रात पाऊस लांबल्यामुळे आणि पाण्याचे साठे अपुरे असल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासू शकतो, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटे ओढावू शकते, अशा विविध प्रश्नांवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 Jayant Patil
Ganesh Sugar Factory Result : भाजपच्या मदतीनेच थोरातांनी विखेंना दिला धक्का; होमग्राऊंडवरच मोठा पराभव

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आजच्या दिवशी गद्दार दिवस म्हणून निषेध व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलनाची तयारी केली होती. मात्र, पोलिसांनी हे आंदोलन होऊ नये यासाठी महेबूब शेख व त्यांच्या सहकाऱ्यांना सकाळीच ताब्यात घेतले, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

 Jayant Patil
Ganesh Sugar Factory : भाजपनेच केली विखेंची कोंडी? राम शिंदेंचे आरोप अन् कोल्हेंनी दिला धक्का

महाराष्ट्रात आंदोलन करण्याची परवानगी मिळत नाही. तसेच कोणीही सरकारविरोधात बोलू नये, अशी मानसिकता ठेवून पोलिसांचा वापर करून, आंदोलने चिरडण्याचे काम महाराष्ट्रात सर्रास सुरु आहे, अशी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com