Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde News: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! गुवाहाटीनंतर शिंदे गट आता अयोध्येला जाणार

सरकारनामा ब्यूरो

Eknath Shinde group visit to Ayodhya : राज्यातील सत्तातरांमुळे गुवाहाटी चांगलेच चर्चेत आलं होतं. ठाकरे गटाकडून गुवाहाटीवरुन शिंदे गटाला वारंवार डिवचलं देखील जातं. मध्यंतरी शिंदे हे आपल्या आमदारांसह कामाख्या देवीचा नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला सुध्दा गेले होते. आता मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे. त्यांनी गुवाहाटीनंतर लवकरच अयोध्येला जाणार असल्याचं सांगितलं आहे. (Shinde group visit to Ayodhya)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील शिरोमणी महाराज बिजली पासी यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी अयोध्या दौर्याबाबत मोठी घोषणा केली आहे.मात्र, हा दौरा कधी केला जाणार , त्यात कोण कोण सहभागी असणार यांसह इतर कोणतीही सविस्तर माहिती एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावेळी दिलेली नाही. परंतू शिंदे यांच्या अयोध्या दौर्याच्या घोषणेवरुन पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

शिंदे म्हणाले, आता आम्ही अयोध्येला लवकरच जाणार आहोत. रामाचं दर्शन आधीही घेतलं होतं. आता पुन्हा घेणार आहोत. वारंवार घेणार आहोत. तसेच अयोध्येत महाराष्ट्र भवनची निर्मिती करण्यात यावी म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवेदन दिलं आहे. त्यामुळे अयोध्येत लवकरच महाराष्ट्र भवन होणार आहे.

आमचं सरकार हे जनतेचं सरकार आहे. सर्व जातीपातींना सोबत घेऊन आम्हाला विकास करायचा आहे. तुम्ही जिथे जिथे असाल, तिथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि आता मी मुख्यमंत्री आहे त्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही असा शब्दही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी पासी समाजाला दिला.

पासी समाजाबद्दल कौतुकोद्गार काढताना शिंदे म्हणाले, आम्ही गुवाहाटीत असताना पासी समाजाने आम्हाला सर्वात आधी पाठिंबा दिला. मी टीव्हीवरून पाहिलं होतं. उत्तर भारत आणि महाराष्ट्र वेगळा नाही. सर्व एकच आहे. तुम्हीही महाराष्ट्रीयन झाला आहात. तुमच्यामुळे आम्हीही वारंवार अयोध्येला जात आहोत. तसेच मुंबईत लवकरच पासी भवन उभारण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT