Sanjay Raut : नव्या राष्ट्रपित्यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता ? ; राऊतांनी डिवचलं

Sanjay Raut : फडणवीस यांनी मांडलेल्या विचारांशी त्यांचा पक्ष सहमत आहे काय ?, असा रोखठोक सवाल अग्रलेखात करण्यात आला आहे.
Narendra Modi, Sanjay Raut, Devendra Fadnavis
Narendra Modi, Sanjay Raut, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची पत्नी अमृता फडणवीस (amruta fadnavis statement) यांनी मोठं विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे भारताचे नवे राष्ट्रपिता (father of the nation)आहेत. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) हे तत्कालीन राष्ट्रपिता होते, असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं आहे. अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

सामना'च्या रविवारच्या अग्रलेखातून अमृता फडणवीस, भाजपचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेचं बाण सोडलं आहेत.‘राष्ट्रपिता’ आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विषयांवरून भाजपवर शिवसेने टीका केली आहे. अमृता फडणवीस यांनी मांडलेल्या विचारांशी त्यांचा पक्ष सहमत आहे काय ?, असा रोखठोक सवाल अग्रलेखात करण्यात आला आहे.

Narendra Modi, Sanjay Raut, Devendra Fadnavis
Eknath Khadse : विलासराव देशमुख, निलंगेकरांप्रमाणेच शिंदे राजीनामा देतील का ? खडसेंचा सवाल

'स्वातंत्र्य लढ्यात तुमचे कुत्रेही मेले नाही. तुम्ही आमच्या बलिदानावर काय बोलणार? काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे हे जळजळीत सवाल भाजपला अस्वस्थ करीत आहेत. तर दुसऱ्या बाजूला श्री. नरेंद्र मोदी हे नव्या भारताचे राष्ट्रपिता असल्याचे सौ. अमृता फडणवीस यांनी जाहीर केले. नव्या राष्ट्रपित्यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढय़ात भाग घेतला होता?,' असा टोला ' सामना'तून लगावला आहे.

Narendra Modi, Sanjay Raut, Devendra Fadnavis
APP Delhi News : 'आप' चे अखेर ठरलं : महापौरपदासाठी प्राध्यापिका मैदानात..

अमृता फडणवीस हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे व त्यांची मते त्या मांडत असतात. आता त्यांनी एक मत मांडले, “आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे, तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत!” सौ. फडणवीस यांचे स्वतंत्र विचार असू शकतात व एक नागरिक म्हणून त्यांना आपली मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.पण त्यांनी मांडलेल्या विचारांशी त्यांचा पक्ष सहमत आहे काय ? असा सवाल अग्रलेखात उपस्थित करण्यात आले आहेत.

'सामना'अग्रलेखात म्हटलं आहे..

  • देशाच्या राजधानीत राहुल गांधींबरोबर लाखो लोक राष्ट्रीय ऐक्यासाठी चालत आहेत. हे चित्र जगात पोहोचेल याचे भय भाजपास वाटते. राष्ट्रपिता महात्मा गांधी निर्भय होते.

  • नव्या भारताच्या नव्या राष्ट्रपित्यांना विरोधकांचे भय का वाटावे ? याचे कारण एकच, स्वातंत्र्यासाठी एकही लाठी न खाणाऱ्यांच्या हाती आज देशाची सूत्रे आहेत.

  • त्यांना लढणाऱ्यांचे व सत्य बोलणाऱ्यांचे भय वाटते. हे किती काळ चालायचे?

  • महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह केला. दांडी यात्रेने देश जागा केला. त्या यात्रेतही आजच्या दिल्लीतील राज्यकर्त्यांचा वंश नव्हता.

  • आता राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा जोरात निघाली. ती दिल्लीच्या सीमेवर पोहोचली तेव्हा कोरोनाचे भय निर्माण करून ती रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com