Vinayak Mete Passes Away
Vinayak Mete Passes Away 
मुंबई

Vinayak Mete| शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर त्यांच्या गाडीला अपघात झाला. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेंटेना कुठलीही मदत मिळाली नाही. अपघाताची माहिती मिळताच मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात (Navi Mumbai MGM Hospital) दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. मेटे यांच्यासह त्यांचा बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर आहे. (Vinayak Mete Passes Away)

विनायक मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम हे अपघातावेळी मेटे यांच्या सोबत होते. या अपघातात कदम यांना किरकोळ मार लागला आहे. या अपघाताची हकीकत कदम यांनी सांगितली. विनायक मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम यांनी एका वृत्त वहिनीला अपघाताबाबत माहिती दिली.

''आम्ही बीडहून आम्ही मुंबईकडे येताना हा अपघात झाला. आम्हाला एका ट्रकने कट मारला. अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही. मदतीसाठी 100 नंबरला आम्ही फोन केला, मात्र त्यांनीही फोन उचलला नाही. मदतीसाठी मी प्रत्येकाला विनवणी करत होतो पण कोणीही मदतीसाठी गाडी थांबवली नाही. मी रोडवर झोपलो, आम्ही गाड्यांना मदतीसाठी विनंती केली. शेवटी एका गाडीवाल्यानं गाडी थांबवली आणि आम्हाला मदत केली. एका तासानंतर तिथं अॅम्ब्युलंस आली. अपघातानंतर मी मेटे यांच्याशी बोललो तर तेव्हा माझ्याशी बोलत होते,'' असंही एकनाथ कदम यांनी सांगितलं.

विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख नेते होते.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी होते

पहिल्यांदा शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार झाले.

त्यानंतर सलग पाच टर्म ते विधानपरिषद सदस्य होते.

मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या जन आंदोलनातील मेटेंचा मोठा वाटा होता.

मराठा आरक्षणासाठी विनायक मेटेंना अनेकदा मोठी आंदोलने केली

मेटे अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारक समितीच्या ते अध्यक्षपदही होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT