Shivsena Bhavan :
Shivsena Bhavan :  Sarkarnama
मुंबई

Shiv Sena : 'शिवसेनाभवन' ठाकरेंचे कि शिवाई ट्रस्टचे ? ; मनसेकडून कागदपत्र व्हायरल , वाचा सविस्तर..

सरकारनामा ब्यूरो

Shiv Sena Bhavan MNS Sandeep Deshpande Tweet : उद्धव ठाकरे यांच्यांकडून शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह (Shiv Sena Symbol) गेले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश शुक्रवारी दिला आहे. निवडणूक आयोगाच्या निकालात शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे.

आता दादरमधील शिवसेना भवन आणि सामना, मार्मिक यांची मालकी कोणाकडे जाणार? असा प्रश्न सामान्यांच्या मनात आहे. शिवसेना गेल्यावर उद्धव ठाकरे यांचा शिवसेना भवनावर अधिकार राहील का, हा प्रश्न आहे.

मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये असणाऱ्या शाखांचे काय होणार? यावर चर्चा होत आहे. यावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी टि्वट करीत उद्धव ठाकरेंनी शिवाई ट्रस्टच्या मालकीत आपलं नाव टाकलं, असा आरोप देशपांडे यांनी केला आहे.

"शिवसेना भवनची मालकी ही शिवाई ट्रस्टकडे आहे. या ट्रस्टमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपले नाव कधीही समाविष्ठ केलं नाही, मात्र उद्धव ठाकरे यांचा ट्रस्टीवर विश्वास नसल्याने त्यांनी आपलं नाव या ट्रस्टमध्ये टाकलं,"असा आरोप देशपांडे यांनी केला आहे. याबाबतचा पुरावा त्यांनी टि्वट करुन शेअर केला आहे.

"आधीच शिवस्मारकात घरच्यांची नाव टाकली आहेत, त्यात हे देखील समोर येत आहे, उद्धव ठाकरे फक्त प्रॉपर्टी जमा करत होते. त्यांच लक्ष फक्त प्रॉपर्टी जमा करण्यात आहे. बाळासाहेब यांनी सांगितलं सर्व करता येतं पण गेलेलं नाव करता येत नाही," असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

शिवसेना पक्ष, धनुष्य़बाण चिन्ह गेल्यानंतरही ठाकरे गटाचे विधीमंडळातील कार्यालय कुणाला मिळणार,याबाबत दोन दिवसापासून चर्चा सुरु होत्या. या चर्चांना आता पुर्णविराम मिळाला आहे. शिवसेनेच्या आमदारांनी (शिंदे गट) ठाकरे गटाचे विधीमंडळातील कार्यालय ताब्यात घेतले आहे. आज शिंदे गटातील आमदारांनी या कार्यालयात प्रवेश केला.

"विधीमंडळातील शिवसेना कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाने योग्य निकाल दिला आहे. नियमात बसणारा सर्व गोष्टी आम्ही करु," असे आमदार भरत गोगावले यांनी कार्यालयात प्रवेश केल्यानंतर माध्यमांना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT