Kasba Peth Chinchwad by elections : कसबा आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आहे. कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने व महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्यात लढत होत आहे. तर चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप विरुद्ध आघाडीचे नाना काटे यांच्यात लढत आहे. भाजप आणि आघाडीनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
महाविकास आघाडीचे दिग्गज नेते प्रचारात सहभागी होत असल्यामुळे भाजपनेही मोठी ताकद लावली आहे. त्यासाठी दोन मंत्री रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन हे निवडणूक होईपर्यंत पुण्यात तळ ठोकून असणार आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कसबा मतदारसंघ पिंजून काढत आहेत.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन गेले. महाविकास आघाडीकडून नाना पटोले, अजित पवारांचा प्रचार सुरु आहे.
आज (सोमवारी) कसबा, चिंचवडमध्ये मेळावे, सभा तर काही पक्षांनी बाईक रॅली, रोड शोचे आयोजन केले आहे. २४ तारीख ही प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे सध्या प्रचार शिगेला पोहचला आहे.
कसब्यात भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत. संध्याकाळी कसब्यात रासनेंसाठी भाजपाचा विजय संकल्प मेळाळ्याचे आयोजन केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन, आमदार रविंद्र चव्हाण मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.
धंगेकर यांच्यासाठी अजित पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे रोड शो मध्ये सहभागी होणार आहे. चिंचवडमध्ये जगताप यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे मार्गदर्शन करणार आहेत.
तर आघाडीचे उमेदवार काटे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांचीही संयुक्त जाहीर सभा सोमवारी होत आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीचे अध्यत्र शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभाचे आयोजन करण्याचे महाविकास आघाडी प्रयत्न आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.