K. K. Sharma, Rashmi Singh Goldi
K. K. Sharma, Rashmi Singh Goldi  Sarkarnama
मुंबई

राष्ट्रवादीच्या एकमेव उमेदवाराविरोधात शिवसेना मैदानात

सरकारनामा ब्युरो

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP Election 2022) शिवसेनेने पहिल्या टप्प्यात 12 जागांवर उमेदवार उभे केले जाणार असल्याची घोषणा केली आहे. शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नुकतीच याबाबत घोषणा केली. या बारा मदारसंघांपैकी एका मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) उमेदवार आहे. त्यामुळे गोव्यात आघाडी केलेले दोन्ही पक्ष उत्तर प्रदेशात मात्र एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. (UP Election Update)

संजय राऊत यांनी नुकताच उत्तर प्रदेशचा दौरा केला आहे. त्यानंतर त्यांनी दोन दिवसांपूर्वी ट्विटरवरून बारा मतदारसंघांची घोषणा केली आहे. त्यामध्ये खतौली, मेरट कैंट, धौलाना, नोएडा, दादरी, सिंकदाराबाद, अनूपशहर (AnupShahar), डिबाई, मांट, मथुरा, खैरागढ आणि दक्षिण आगरा या मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघ पहिल्या टप्प्यातील आहे. राऊतांनी या मतदारसंघातील उमेदवारांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

या बारा मतदारसंघांपैकी अनूपशहर या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून के. के. शर्मा (K. K. Sharma) हे उमेदवार आहेत. उत्तर प्रदेशात राष्ट्रवादीने समाजवादी पक्षासोबत आघाडी केली आहे. या आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला हा मतदारसंघ आला आहे. या मतदारसंघात आतापर्यंत एकदाही समाजवादी पक्षाचा उमेदवार निवडून आलेला नाही. आता याच मतदारसंघात शिवसेने रश्मि सिंह गोल्डी (Rashmi Singh Goldi) यांना उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रवादीच्या वाट्याला उत्तर प्रदेशात हा एकमेव मतदारसंघ आला आहे. तिथेही आता राष्ट्रवादीला इतर पक्षांप्रमाणे शिवसेनेला टक्कर द्यावी लागणार आहे. रश्मि गोल्डी यांनी प्रचारालाही सुरूवात केली आहे. तर शर्मा यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) मैदानात उतरले आहेत. या मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार आहेत. त्यांनाच पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचा या मतदारसंघात कस लागणार आहे.

राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांनी शर्मा यांच्या प्रचाराची सुरूवात केली आहे. त्यांनी शनिवारी उत्तर प्रदेश गाठत गाठीभेटींना सुरूवात केली. करौली, अनूपशहर आणि सिरौरा बांगर येथील लोकांशी त्यांनी संवाद साधला. तसेच औरंगाबाद-जहांगीराबाद येथील लोकांनाही राष्ट्रवादीला विजयी करण्याचे आवाहन केले. मलिकांनी या दौऱ्यात राष्ट्रवादीसह समाजवादी पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेत प्रचाराच्या तयारीचा आढावाही घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT