अशीही नामुष्की : राष्ट्रवादी अन् सेनेच्या उमेदवारांचे प्रत्येक निवडणुकीत डिपॉझिट जप्त

गोवा विधानसभेत एकदाही शिवसेनाचा आमदार निवडून गेलेला नाही.
Shiv Sena, NCP
Shiv Sena, NCPSarkarnama

मुंबई : गोवा विधानसभेच्या निवडणुकीत (Goa Election 2022) राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने (Shiv Sena) आघाडी केली आहे. दोन्ही पक्षांकडून 20 ते 25 जागांवर उमेदवार उभे केले जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादीही जाहीर कऱण्यात आली आहे. पण गोव्यातील निवडणुकांचा इतिहास दोन्ही पक्षांसाठी फारसा चांगला राहिलेला नाही. प्रत्येक निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या बहुतेक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

मागील काही वर्षांत झालेल्या निवडणुकांमधील स्थिती पाहिली तर शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मिळणाऱ्या मतांची टक्केवारी अधिक आहे. गोव्यात (Goa) शिवसेना 1989 पासून तर राष्ट्रवादी कडून 2002 पासून उमेदवार उभे केले जात आहेत. महाराष्ट्रात 2019 मध्ये महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सत्तेत आल्यानंतर राज्याबाहेर पहिल्यांदाच राष्ट्रवादी व शिवसेनेची आघाडी झाली आहे. आतापर्यंत गोव्यात शिवसेना एकटीच लढत होती. (Goa Election Update)

Shiv Sena, NCP
गृहमंत्र्यांना अटक होऊ शकते! मुख्यमंत्री केजरीवालांनीच केला गौप्यस्फोट

2007 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसशी आघाडी केली होती. 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने 17 जागांवर उमेदवार उभे केले होते. पण केवळ एका जागेवरच विजय मिळाला. तर 16 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. पक्षाला या निवडणुकीत 20 हजार 916 मतं मिळाली होती. तर शिवसेनेने तीन ठिकाणी उभ्या केलेल्या उमेदवारांना केवळ 792 मतं मिळाली. 2012 मध्येही राष्ट्रवादीच्या तीन उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. यावेळी सात उमेदवार उभे करण्यात आले होते.

2012 च्या निवडणुकीतही सेनेच्या तीनही उमेदवारांना डिपॉझिट वाचवता आले नव्हते. या निवडणुकीत तर पक्षाला केवळ 210 मतं मिळाली. 2007 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सहापैकी तीन उमेदवार विजयी झाले होते. तर जागेवरील उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले. या निवडणुकीतही शिवसेनेचे पानिपत झाले होते. सर्व सात उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. 2002 च्या विधानसभा निवडणुकीतील चित्रही फारसे वेगळे नव्हते.

Shiv Sena, NCP
काँग्रेसला अजूनही भाजपची भीती; उमेदवारांना थेट मंदिर, चर्चमध्ये नेलं अन्...

राष्ट्रवादीच्या 20 उमेदवारांपैकी एकाने विजय मिळवला. तर 12 जणांचे डिपॉझिट जप्त झाले. या निवडणुकीत तर शिवसनेच्या 15 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. 1999 मध्येही सेनेच्या 14 पैकी एकाही उमेदवाराला डिपॉझिट वाचवता आले नव्हते. 1989 मध्ये सहापैकी पाच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. या निवडणुकीत सेनेला जवळपास पाच हजार मतं मिळाली होती. 1994 हे वर्ष सेनेसाठी अपवाद ठरलं होते. या निवडणुकीत सेनेने मैदानात उतरवलेल्या दोन उमेदवारांना 8 हजार 347 मतं मिळाली होती. दोघांचंही डिपॉझिट वाचलं होतं. पण 1989 पासून सेनेचा गोव्यात एकही आमदार निवडून आलेला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com