Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray News sarkarnama
मुंबई

उद्धव ठाकरेंच ठरलं; खासदार जाधव अन् भावना गवळींच्या मतदारसंघात धडकणार!

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray News : शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे मोठी फुट पडली आहे. यामुळे पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत त्यांनी मुंबईमध्ये शिवसेना (Shivsena) भवनामध्ये आणि 'मातोश्री' या निवास्थानी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत रणनिती आखली.

मात्र, आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रत्यक्ष मैदानावर उतरणार आहेत. ते राज्याच्या अनेक भागामध्ये सभा घेणार आहेत. त्याची रुपरेषा ठरली आहे. त्यामध्ये 31 ऑक्टोबर ते 14 नोव्हेबर पदाधिकारी, जिल्हाप्रमुखांच्या बैठका दुपारी 12. 30 ते 4.30 या वेळेत होणार आहेत.

5 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची एकत्र पत्रकार परिषद होणार आहे. तर 14 नोव्हेंबरला पदाधिकारी बैठकांचे सत्र संपनार आहे. 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे. त्या निमित्ताने मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाऊ शकते.

20 किंवा 21 नोव्हेंबरला वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेणार आहे. त्यामुळे राज्या पुन्हा एकदा नव्या युतीची नांदी होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर 26 नोव्हेंबरला बुलडाणा येथील चिखली येथे शेतकरी मेळावा होणार आहे. या मेळाव्याला लाखो शेतकरी उपस्थित राहणार आहे. त्यांना उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. बुलडाणा हा खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांचा मतदार संघ आहे.

तर उद्धव ठाकरे यांचा बहुचर्चीत दौरा असणार पोहरा देवीचा दौराही ठरला आहे. उद्धव ठाकरे 3 डिसेंबरला पोहरा देवीच्या दर्शनाला जाणार आहेत. पोहरा देवी हे बंजारा समाजाचे श्रद्धास्थान आहे. तसेच ते खासदार भावना गवळी (Bhavna Gawli) यांच्या मतदार संघात आहे. येथेही उद्धव ठाकरे मोळावा घेणार असल्याची माहिती आहे.

संजय राठोड हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेल्यानंतर त्यांना घेरण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवीचे महंत सुनील महाराज आणि माजी आमदार देशमुख यांना शिवसेनेत आणले आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंचा दौरा यामुळे राठोड यांच्या समोरील अडचणी वाढणार असल्याचे सांगितेल जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT