Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Shivsena News : "ते कशासाठी लोटांगण घालताहेत...?" उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर शिंदे गटाची बोचरी टीका

Jagdish Patil

Mumbai News, 06 August : 'जे आम्हाला दिल्लीची पायपुसणी म्हणायचे ते आता दिल्लीत कशासाठी लोटांगण घालायला जात आहेत', अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. यासाठी पक्षाच्या प्रमुखांनी यात्रा, मेळावे आयोजित करुन पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठीची रणनीती आखल्याचं पाहायला मिळत आहे.

राज्यात लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. त्यासाठी आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र येऊन जागावाटपाची चर्चा करत आहेत. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सर्वोच्च सुनावणी दिल्लीत होत होत आहे. यासाठी ते दिल्ली दौऱ्यावर आहेत.

या दौऱ्यादरम्यान ते इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी गाठी घेणार आहेत. त्यामध्ये सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह टीएमसीच्या नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) दिल्ली दौऱ्यावरुन ठाकरे गटाकडून सतत टीका केली जाते. त्यामुळे आता ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी टीका केली आहे.

शिरसाट म्हणाले, "जे आम्हाला दिल्लीची पायपुसणी म्हणायचे, ते आता दिल्लीत कशासाठी लोटांगण घालायला जात आहेत. संजय राऊत हे तर वाढपीच्या भूमिकेत आहेत. कोणाला लोणचं द्या, कोणाला पाणी भरून दे, जे एकेकाळी दिल्लीचे नेते महाराष्ट्रात जागा वाटपासाठी येत होते, आता ती परिस्थिती राहिलेली नाही, अशा शब्दात शिरसाट यांनी ठाकरे गटावर टीका केली.

दरम्यान, यावेळी त्यांनी विधानसभेच्या जागावाटपाबाबतची भूमिका स्पष्ट केली. लोकसभेला खाल्लेली ठेच लक्षात घेता, विधानसभेला आम्ही आमच्या जागा घेऊच, पण यावेळी उमेदवार निश्चितीमध्ये कुठलाही हस्तक्षेप होणार नाही. आमच्या जागांचा निर्णय आम्ही घेऊ, असं शिरसाट यांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT