sarkarnama

मुंबई

मुख्यमंत्र्यांची बदनामी करणारं 'ते' टि्वट राणेंच्या अंगलट ; शिवसेना आक्रमक

आता सत्तेच्या लाचारीसाठी मा. बाळासाहेबांच्या #ShivSenaचं नाव बदलणार का? असं टि्वट नितेश राणेंनी बुधवारी केलं होत. या टि्वटवरुन राणे आणि शिवसैनिक असं शीतयुद्ध पेटलं आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजपचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची बदनामी करुन दोन समाजात तेढ निर्माण केल्याची तक्रार शिवसैनिकांनी केली आहे. नितेश राणे यांनी बुधवारी केलेले टि्वट त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वीर जिजामाता उद्यानाचे नाव रातोरात बदलून हजरत पीर बाबा अशी कोनशीला लावून बदलले असल्याचे ट्वीट नितेश राणे यांनी बुधवारी केले होते. या कोनशीलेचा फलक नितेश राणे यांनी टि्वट करुन शेअर केला होता. या उद्यानाचे नाव बदलले नसल्याचे उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी देखील सांगितले होते. 'उद्यानाचे नाव बदलले नाही,' असे संबधित अधिकाऱ्यांची स्पष्ट केलं आहे.

''तमाम हिंदूच्या मॅांसाहेब जिजामाता भोसले यांच्या नावाने असलेले वीर जिजामाता उद्यानाचे नाव रातोरात बदलून हजरत पीर बाबा अशी कोनशीला लावून बदलले आहे. आता सत्तेच्या लाचारीसाठी मा. बाळासाहेबांच्या #ShivSenaचं नाव बदलणार का? असं टि्वट नितेश राणेंनी बुधवारी केलं होत. या टि्वटवरुन राणे आणि शिवसैनिक असं शीतयुद्ध पेटलं आहे. राणेंच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे यांची बदनामी करुन दोन समाजात तेढ निर्माण केल्याची तक्रार शिवसैनिकांनी मुंबईतील काळाचौकी वरळी आणि भोईवाडा पोलीस ठाण्यात केली आहे. भाजप नेते नितेश राणे यांनीही यावर ट्वीट करत ठाकरे सरकारवर निशाणा बुधवारी साधला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राणीबागेत हजरत हाजी पीर बाबा यांचा दर्गा आहे. या दर्ग्याची माहिती देणार्‍या सूचना फलकावर प्रशासनाने ‘हजरत हाजी पीर बाबा राणी बाग’ असा उल्लेख केल्याने यावर राणेंनी आक्षेप घेतला आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी टीका केली आहे.

''उद्यानाचे नाव राणी बाग नसून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय असे आहे. पूर्वीच्या काळापासून लोक उद्यानास राणीबाग म्हणून संबोधत आले आहेत. त्यामुळे जिजामाता उद्यानातील या जुन्या दर्ग्याचे नाव ‘हजरत हाजी पीर बाबा राणीबाग’ असे पडले आहे. या दर्ग्याची माहिती देणारा सूचना फलक उद्यानात लावण्यात आला आहे. उद्यानात प्रवेश करताना मुख्य प्रवेशद्वारावर आजही ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय’ असे नाव आहे. त्यात कोणताही बदल केलेला नाही,'' असे उद्यानाच्या सुत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT